Rickshaw Accident
Rickshaw Accident sakal
पुणे

Wild Boar Attack : रानडुक्कराच्या हल्ल्यात भाविकांची रिक्षा खोल दरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

मनोज कुंभार

पानशेत धरण खोऱ्यातील कादवे खिंडीतून वरघड येथे जात असताना भाविकांच्या रिक्षावर एका उन्मत रानडुक्कराने अचानक हल्ला करत जोरदार धडक दिली.

वेल्हे, (पुणे) - पानशेत धरण खोऱ्यातील कादवे खिंडीतून वरघड येथे जात असताना भाविकांच्या रिक्षावर एका उन्मत रानडुक्कराने अचानक हल्ला करत जोरदार धडक दिली. त्यात रिक्षा वेगाने पलट्या मारत खोल गोपाळ वस्ती दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक भाविक जागीच ठार झाला. तर त्याचा चुलत पुतण्या गंभीर झाला. रिक्षा चालकासह दोघांना जबर मार लागला आहे.

भागुजी धाऊ मरगळे (वय ६०, सध्या राहणार नसरापूर, मुळ राहणार शिरकोली, ता. वेल्हे) असे मयत भाविकाचे नाव आहे. मयत मरगळे यांचा चुलत पुतण्या गंभीर पांडुरंग धाऊ मरगळे (वय ४५, रा. शिरकोली, सध्या राहणार डोणजे) हा गंभीर झाला असून, त्याच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रिक्षा चालक सुरेश कोंडीबा ढेबे (रा. पोळे, ता. वेल्हे) व अशोक बबन मरगळे (वय ३१, रा. शिरकोली) अशी इतर दोन जखमींची नावे आहेत. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात अद्यापही अपघात झाल्याची नोंद नसल्याची माहिती वेल्हे सहाय्यक पोलीस फौजदार सुदाम बांदल यांनी दिली. हि घटना शुक्रवार (ता. २४) रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

मयत भागुजी मरगळे व इतर दोघे जण हे सुरेश ढेबे यांच्या रिक्षाने गुरुवारी (ता. २३) रोजी मध्यरात्री एक दिड वाजण्याच्या सुमारास पानशेत धरणा जवळील वेल्हे- कादवे खिंडीतील कच्च्या रस्त्याने वरघड येथील जोगाबा देवस्थानकडे चालले होते. उंच डोंगर माथ्यावरील कच्च्या रस्त्याने मंदगतीने रिक्षा चालली होती. त्यावेळी अचानक एक रानडुक्कर धावत आले. काही क्षणात रानडुक्कराने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षा पलटी होऊन वेगाने खोल दरीत कोसळली. रिक्षा चालक सुरेश ढेबे व अशोक मरगळे हे प्रसंगावधानतेने आडरानात उड्या मारून बाहेर पडले. मात्र पाठीमागच्या सिटावर बसलेले भागुजी मरगळे व पांडुरंग मरगळे हे रिक्षासह खोल दरीत फेकले गेले. खडक धोंड्यांचा मार लागुन भागुजी मरगळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मरगळे यांच्या नातेवाईकांनी वेल्हे पोलीसांना माहिती दिली. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सुदाम बांदल, पोलिस जवान ज्ञानेश्वर शेडगे व वैजनाथ घुंमरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. शिरकोली ,कादवे येथील युवक, ग्रामस्थही दाखल झाले.

पोलिस फौजदार बांदल यांनी तातडीने मणेरवाडी (ता. हवेली) येथील मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक रेस्कु ऑपरेशन पथकाचे तानाजी भोसले यांच्याशी संपर्क साधला. मध्यरात्री दिड वाजता काळोखात दोर खंडाच्या साह्याने त्यांनी रेस्कु ऑपरेशन सुरू केले. सिंहगड येथील गिर्यारोहक व रेक्सु पथकाचे तानाजी भोसले यांनी जीवाची बाजी लावत दुर्गम कातरखडकाच्या अति बिकट खोल दरीत उतरून स्थानिक युवकांच्या मदतीने गंभीर जखमी तसेच मयत भाविकाचा मृतदेह बाहेर काढला.

दरीत कोसळलेल्या पांडुरंग मरगळे यांना गंभीर जखमी अवस्थेत सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर तानाजी भोसले यांनी भागुजी मरगळे यांचा मृतदेह दरीच्या तळातुन खांद्यावर घेऊन कड्याच्या खडकापर्यंत आणला. तेथुन स्ट्रेचवर बांधुन माथ्यावर मृतदेह आणला.

स्थानिक कार्यकर्ते सुनील मरगळे, नितीन ढेबे, संतोष साळेकर,मारुती मरगळे, सुनील मरगळे, चैतन्य पोळेकर, सुरेश शिर्के, सदाशिव शेळके,अर्जुन शिर्के आदी मदतकार्यात सहभागी झाले होते. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या देखरेखीखाली वेल्हे पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT