Oil 
पुणे

बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा; सामान्य पुणेकरांच्या खिशाला बसतेय झळ!

समाधान काटे

शिवाजीनगर (पुणे) : अनलॉकनंतर मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे. भारतामध्ये जवळपास ७० ते ८० टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये सुर्यफूलाचे तेल युक्रेन, रशिया या देशांमधून आयात केले जाते. मात्र, या वर्षी युक्रेनमध्ये पीक खराब झाल्याने आणि रशियामध्ये सुर्यफूलाच्या पिकाची कमतरता आणि निर्यात दर वाढल्याचा फटका तेलाच्या भाववाढीवर झाला.

सोयाबीनचे तेल अर्जेंटिना या देशातून आयात केले जाते. तेथील कामगार संघटनांनी बंद पुकारल्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. पाम तेलाची आयात मलेशिया देशातून केली जाते. सुर्यफूल आणि सोयाबीन या दोन्ही तेलाचे भाव वाढल्याने पाम तेलाचे भाव वाढवण्यात आले. या अगोदर एवढी प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवसेंदिवस तेलाच्या किमती वाढत चालल्याने सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे.

"घरातील बहुतांशी पदार्थ बनवण्यासाठी तेल वापरावे लागते. तेलाचे दर दिवसेंदिवस वाढतायत. गृहिणी महिन्याला तेलासाठी एक रक्कम वेगळी काढून ठेवत असतात, आता त्यामध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी भाववाढ चिंतेची बाब आहे."
- सीमा (खत्री) जोशी, गृहिणी, गुजरात कॉलनी, कोथरूड.

"तेलाचे भाव वाढल्यामुळे मागणी कमी झाली आहे. गुंतवणूकीचे प्रमाण वाढले आणि तेजीनंतर मंदी झाल्यास व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे."
- खुशाल उणेचा, तेलाचे व्यापारी मार्केट यार्ड.

"आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही महिन्यात तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून तेलाचं स्थिर झाले आहेत".
- रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी, मार्केट यार्ड.

वर्षभरात झालेली भाववाढ

तेल प्रकार दर (जानेवारी २०२०) दर (जानेवारी २०२१)
सुर्यफूल १४२० ते १४८०, १५ लि. १९८० ते २०४०, १५ लि.
सोयाबीन १४२० ते १५००, १५ किलो १९२० ते २०००, १५कि
पाम १३८० ते १४३०, १५ किलो  १७८० ते १८२०, १५ किलो

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बहिणीच्या विजयानंतर धनंजय मुंडे थेट गंगाखेडमध्ये, बहीण उर्मिला केंद्रे विजयी

U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Loha election result : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का! लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपचे एकाच कुटुंबातील सहा जण पराभूत!

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

Latest Marathi News Live Update: २६ नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

SCROLL FOR NEXT