rope dealers business is closed due to corona 
पुणे

कोरोनामुळे पोटाचा पीळ आणखी घट्ट; दोर विक्रेत्यांची व्यथा

सकाळवृत्तसेवा

बिबवेवाडी : कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व स्तरातील उद्योग धंदे ठप्प झालेले असून उभारी घेण्यासाठी काही काळ जाणार आहे, परंतु हातावर पोट असणारे उद्योग करणाऱ्यांना कधी उभारी मिळणार? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हातावर पोट असणाऱ्यांना दोर तयार करून विकणाऱ्या गिहरा समाजाची अशीच अवस्था झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात त्यांना रस्त्यावर मिळेल तो व्यवसाय करून पोट भरावे लागत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहीहंडीचा उत्सव म्हणजे दोर विक्रीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो, परंतु यंदा कोरोनामुळे दहीहंडी, गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याने दोर विक्री होणार नाही. त्यामुळे पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्यावर मिळेल ते काम करत आहेत.

गिहरा समाजातील महिला सहा महिन्यापासून दहीहंडीच्या उत्सवासाठी दोरखंड तयार करतात. त्यात झाड तीन वळ्या असलेल्या पन्नास फुटी दोर ते शिकाळे, कासरा, मोहरक्या, चराट, मोटच्या दोर बनवतात परंतू, यंदा दहीहंडी उत्सव नसल्याने तयार केलेले दोर पडून आहेत. 

शहरालगत असलेले आठवडे बाजारात मालाला उठाव नाही, त्यामुळे घरातील लहान मुलं, महिला व पुरुष संपूर्ण कुटुंबच लिंबू विक्री करून त्यावर कुटुंब चालवत आहेत. परंतू, तुटपुंज्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे काम मिळेल ते करत असल्याचे, निलेश माळी यांनी सांगितले. 
पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT