RTE Admission Google
पुणे

आरटीई प्रवेश कधी होणार; वाचा सविस्तर

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन लॉटरीमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन लॉटरीमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सध्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले संचारबंदीचे निर्बंध उठविल्यानंतरच प्रवेशाबाबतच्या पुढील सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाचा मार्ग संचारबंदी संपल्यानंतरच मोकळा होणार आहे.

आरटीईअंतर्गत राखीव प्रवेशाकरिता राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली होती. याद्वारे ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी ७ एप्रिलला लॉटरी काढली. या लॉटरी प्रक्रियेच्या कामकाजाला वेळ लागणार होता, म्हणून पालकांना १५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे एसएमएस येतील, असे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले. त्याप्रमाणे १५ एप्रिलपासून पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात पालकांना एसएमएस येण्यास सुरवात झाली. पुणे जिल्ह्यात बोगस अर्ज सापडल्याने प्रवेशासाठी लॉटरी काढली असली, तरीही शुक्रवारपर्यंत पालकांना प्रवेश निश्चितीसाठी एसएमएस पाठविले नव्हते. मात्र, त्यानंतर शुक्रवारी उशिरा पुण्यातील पालकांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पोर्टलवर मिळणार सूचना

३० एप्रिलनंतरच प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी समितीकडे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गर्दी करू नये, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने प्रवेशाच्या पोर्टलवर दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील आकडेवारी

९८५ - शाळा

१४,७७३ - प्रवेशासाठी उपलब्ध जागा

५५,८१३ - प्रवेशासाठी आलेले अर्ज

१४,५६७ - लॉटरीद्वारे निवड झालेले विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT