vinayak shirsat
vinayak shirsat 
पुणे

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या ?

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट - मुठा (मुळशी) येथील खिंडीलगतच्या जंगलात पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सिरसाट यांचा मृतदेह सापडला आहे. आठ दिवसांपासून ते बेपत्ता होते. पोलिस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक सिरसाट हे ३० जानेवारी रोजी कात्रज येथून अचानक बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलिस चौकीत तक्रार दिली होती. सिरसाट यांचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही ते न सापडल्याने ५ जानेवारी रोजी ते बेपत्ता असल्याची नोंद करून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता. 

दरम्यान, सिरसाट यांच्या मोबाईल लोकेशनचा तपास करत असताना त्यांच्या फोनचे लोकेशन पुणे-लवासा रस्त्यावरील मुठा गावच्या हद्दीत दिसून येत होते. त्यनुसार तपास केला असता पोलिसांना त्यांचा मृतदेह मुठा (ता. मुळशी) येथील खिंडीलगतच्या जंगलात अढळला. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

त्यांच्या अंगावरील कपडे व मोबाईल लोकेशन यामुळे सिरसाट यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली. पौडचे पोलिस निरीक्षक सुरेश निबांळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह शोधण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना मोलाची मदत केली. पुढील तपास भारती विद्यापीठ चौकीचे पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT