A rumor message sent to the Divisional Commissioner in pune 
पुणे

CoronaVirus : पुण्यात विभागीय आयुक्तांनाच पाठविला अफवेचा संदेश!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरेगाव पार्क येथील नामांकित हॉटेलमध्ये 'कोरोना'चा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्ती असल्याची माहिती एकाने थेट विभागीय आयुक्तांना पाठविली. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ तपासणी केली. मात्र, ती माहिती खोटी असल्याचे आढळल्याने अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध यापुढे कडक कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने संदेश पाठविला. त्यात कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण राहत आहेत, असा उल्लेख होता.

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

डॉ. म्हैसेकर यांनी त्या संदेशाची गांभीर्याने दखल घेत प्रशासकीय यंत्रणेला रुग्णांचा शोध घेण्याच्या कामाला लावले. तपासणीत कोरोनाग्रस्त आढळून आले नाहीत. संबंधित संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांनीच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध फिर्याद दिली. हा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीचा कोरेगाव पार्क पोलिस शोध घेत आहेत.


अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई
व्हॉट्‌सऍप, फेसबुक व अन्य समाजमाध्यमांद्वारे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. दरम्यान, अफवेचा हा संदेश थेट विभागीय आयुक्तांपर्यंत पोचल्यामुळे त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला आळा बसणार आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

Coronavirus : सोसायट्यांचे जिम, स्वीमिंग टँक बंद

"कोरेगाव पार्क परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण राहत असल्याचा संदेश अनोळखी व्यक्तीने विभागीय आयुक्तांना पाठविला होता. प्रशासनाने शोध घेतल्यानंतर तो संदेश अफवा पसरविणारा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.''
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor Death Case: हत्या की आत्महत्या? एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीचं मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

Share Market Closing : फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी सेन्सेक्स 369 अंकांनी वधारला; तर निफ्टी निर्देशांक 26,000 वर, जाणून घ्या कोणत्या शेअर्सने दिले सर्वाधिक परतावे

Latest Marathi News Live Update : ८५ देशांची भागीदारी, शिपिंग क्षेत्रात नवे करार; मोदी म्हणाले, भारतील सागरी क्षेत्रावर वाढतोय जगाचा विश्वास

SBI Job Vacancy 2025: SBI जॉब अलर्ट! स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, पॅकेज तब्बल 1.35 कोटी

बिग बॉस 19 साठी सलमानला मिळतं 150-200 कोटी मानधन ! निर्मात्याचा धक्कादायक खुलासा "आम्ही भांडतो पण.."

SCROLL FOR NEXT