UPSC_Rushikesh_Deshmukh 
पुणे

पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त मारली बाजी; भोरच्या ऋषिकेशला मिळाली ६८८ वी रँक

सकाळ वृत्तसेवा

UPSC Result 2020 : पुणे : भोर तालुक्यातील साळवडे गावातील ऋषिकेश देशमुख याने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत. देशात ६८८ वा रँक मिळवला आहे. 

ऋषिकेशचे शिक्षण टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले आहे, तर गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. इकॉनॉमिक्स आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामधून एम.ए. पॉलिटिकल सायन्स केले. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्याने प्रवीण चव्हाण यांच्या संस्थेतून मार्गदर्शन घेतले.

ऋषिकेशचे वडील कुपोषित मुलांसाठी सामजिक काम करतात. पुणे जिल्हा आरोग्य देखरेख समिती व कुपोषण विषयावरील जिल्हा गाभा समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ऋषिकेशचे वडील श्रीपाद देशमुख म्हणाले, "ऋषिकेशने पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. आता मिळेल ती पोस्ट घेईल, पण त्याचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याने त्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करेल."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT