टाकळी हाजी (पुणे) : जिद्द असेल तर कष्टाने यशाला गवसणी घालणे अवघड नसते. हेच आपल्या कृतीतून चांडोह ( ता. शिरूर ) येथील सचिन बाळासाहेब सालकर याने सिध्द करुन दाखवले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सचिनने वित्त व लेखाधिकारी या क्लासवन पदाचे स्वप्न साकारले आहे. सचिनचे वडील बाळासाहेब सालकर शेतकरी व वारकरी संप्रदायातील आहे. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी प्राथमिक शिक्षणापासून मुलगा अंत्यत हुशार असल्याने मुलाने सरकारी अधिकारी बनावे अशी मनोमन इच्छा होती. त्याने त्याचे करिअर घडवावे व उच्चपदस्थ अधिकारी बनावे यासाठी त्यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले. वडीलांसोबतच सर्व गुरूजन, कुटुंबिय व मित्रांचीही साथ असल्याने सचिनने शासकीय अधिकारी बनण्याचे ठरविले.
दिवसातील 15 तास अभ्यासावर त्याने लक्ष केंद्रीत केले. शेतकरी कुटुंब असल्याने सातत्याने बाजारभाव व नैसर्गिक अडचणी समोर होत्या. मात्र, कुटुंबियांनी त्याला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहित केले. त्याचा प्रवास सुरु झाल्यानंतर 2012 मध्ये विक्रीकर निरीक्षक म्हणून त्याची निवड झाली. मात्र, यावर त्याचे समाधान होत नव्हते.
त्याने अधिक जोमाने अभ्यास सुरु केला. विक्रीकर निरीक्षक या पदावर त्याची नियुक्ती झाल्यावरही त्याने जिद्द सोडलेली नव्हती. सरकारी सेवेत काम करत त्याने अभ्यास सुरू ठेवला. त्या दरम्यान लग्न व प्रांपचिक अडचणी सुरू झाल्या. पण सचिनने क्लासवन होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने कोणतेही क्लास व ट्युशन केल्या नाहीत. अखेर 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात सचिन वित्त व लेखाधिकारी या पदासाठी परीक्षा उत्तीर्ण झाला. आई वडीलांचे, गुरूजनांचे व ग्रामस्थांचे स्वप्न साकारत त्याने क्लासवन पदापर्यंत मजल मारली. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, सरपंच दामू घोडे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, सावित्रा थोरात यांनी सचिनचा सत्कार केला.
मनातून ठरविले तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. त्यासाठी जिद्द व चिकाटी कायम ठेवली पाहिजे. आईवडील, गुरूजन यांचे आर्शिवाद व मित्रांच्या शुभेच्छा पाठीशी असल्याने हे यश मिळू शकलो. भविष्यात गावासाठी सामाजिक कार्य करण्याची इच्छा असल्याचे सचिनने यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.