HSC-Books 
पुणे

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, पुस्तकांची विक्री झाली सुरू; ऑनलाइनही ऑर्डर करता येणार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांची विक्री बुधवार (ता.२७)पासून बालभारतीच्या सर्व भांडारांमधून सुरू झाली. खासगी पुस्तक विक्रेत्यांकडेही ही पुस्तके उपलब्ध होऊ लागली आहेत.

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या पहिली ते अकरावीच्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीपासून बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. आता बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. 

गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीला विज्ञान शाखेची पुस्तके उपलब्ध केली असून, पुढील दोन दिवसात वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके उपलब्ध असतील. 

सुमारे ९५ लाख पीडीएफ
खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्‍तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाईल पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्‍या आहेत.

मंडळाच्या इतिहासात प्रथमच बाजारात पुस्तके उपलब्ध होण्याआधी त्याच्या पीडीएफ फाईल ऑनलाईन मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत बारावीच्या 24 लाख आणि पहिली ते अकरावीच्या 70 लाख 92 हजार पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्या गेल्या आहेत, असे बालभारतीमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात देखील पाठपुस्तक मंडळाने पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आता शारीरिक अंतर ठेवत, सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्यासाठी पाठ्यपुस्‍तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे.

पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे, असे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

Ration Shop Onion Supply : रेशन दुकानात मिळणार स्वस्त कांदा, कृषी मूल्य आयोग उपसमितीचा अहवाल; अतिरिक्त पुरवठाकाळातील प्रभावी उपाय

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड येथे आज अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT