saloon.jpg 
पुणे

Video :...म्हणून नाभिक समाज व सलून व्यावसायिक जाणार हायकोर्टात

सकाळवृत्तसेवा

पुणे : नाभिक समाज व सलून व्यावसायिक करणार हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यावसायिक व सलून संघटनांमध्ये काल चर्चा झाली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. विमान सेवा, एस टी सेवा, लाइनमध्ये दारू विक्री केले जाते. या धर्तीवर फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सलून व्यावसायाला परवानगी द्यावी. अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत नाभिक समाज नेते व सलून पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी माहिती दिली. 

काशिद म्हणाले, कोरोना व लाॅकडाऊनमुळे अर्थिक संकटामुळे पाच आत्महत्या झाल्या आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्रातील 10 लाख सलून व्यावसायिक व त्यांची 40 लाख लोकसंख्या असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिने झाले सतत अर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करीत आहोत. आजपर्यंत सरकार कडून कोणतीही अर्थिक मदत नाही. कुटुंबियांचा घर खर्च भागवणे, दुकान भाडे व लाईट बिल कसे भरणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सरकार कडून कोणतीही सलून व्यावसायिकांना मदत अथवा मार्गदर्शन किंवा साधी विचापूस नाही. मुख्यमंत्री नाभिक समाज व सलून व्यावसायिक यांचे म्हणणे ऐकण्यासाठी वेळ देत नाहीत व भेटत नाहीत. त्यामुळे आता कठोर पावले उचलावी लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT