Ajit Pawar Sanjay Raut Sakal
पुणे

Pune Politics : "कसेल त्याची जमीन या प्रमाणे…"; पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राऊतांच सूचक वक्तव्य

रोहित कणसे

भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. पुणे लोकसभेची जागा कोणाला मिळावी यासाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत. लोकसभेची लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुण्याची जागा कोणाला मिळावी यावरू महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यानंतर आता या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र ज्याची ताकद जास्त असेल त्याला ही जागा मिळावी असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आत पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, अशी भूमिका अजित पवार यांची आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे."कसेल त्याची जमीन या प्रमाणे… जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरलं तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!", असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते देखील या जागेवर दावा सांगत आहेत. काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असून आम्ही येथून पोटनिवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणूकीपूर्वीच चुरस वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT