Satbara Sakal
पुणे

पीककर्जासाठी ७० बॅंकांत ऑनलाइन सातबारा

राज्यातील २३ जिल्हा बॅंकांचा समावेश; महसूल विभागासोबत सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीक कर्ज (crop loan) घेण्यासाठी शेतकऱ्यांना (farmer) आता तलाठी कार्यालयांचे दरवाजे झिजवावे लागणार नाहीत. शिवाय केवळ सातबारा उताऱ्याअभावी कर्ज मिळण्यास होणारा विलंब कमी होणार आहे. राज्यातील २३ जिल्हा बॅंकांसह ७० बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी स्वतःहून आॅनलाइन सातबारा उतारा मिळविण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी महसूल विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे पीक कर्जवाटप आणखी सुलभ होणार आहे. या करारामुळे ७० बॅंकांच्या सुमारे साडेसहा हजार शाखांमध्ये आॅनलाइन सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. (Satbara online 70 banks crop loan)

आतापर्यंत केवळ पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंकांमध्येच तीन वर्षांपासून ही सुविधा उपलब्ध होती. शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी शेतीचा सातबारा आणि फेरफार उतारा बॅंकांकडे कर्ज मागणी करताना देणे अनिवार्य आहे. हे उतारे दरवर्षीचे नवे असावे लागतात. त्यामुळे कर्ज घ्यायचे असेल तर, आधी हे उतारे मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयांचे दरवाजे झिजविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असे.

राज्याच्या महसूल विभागाने डिजिटल साताबारा उतारे वितरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून थेट बॅंकांही शेतकऱ्यांचे सातबारा उतारे मिळवू शकते, अशी सोय सरकारने उपलब्ध केलेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा मिळविण्यासाठीचा वेळ, पैसा आणि श्रम वाचविणे हा आॅनलाईन सातबारा उतारा वितरणामागचा सरकारचा उद्देश आहे.

या जिल्हा बॅंकांमध्ये सोय

पुणे, सातारा, रत्नागिरी, गोंदिया, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे, बुलडाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर.

पुणे शहर, जिल्ह्यातील बॅंका

  • बॅंक ऑफ महाराष्ट्र

  • कोटक महिंद्रा बँक

  • एचडीएफसी

  • आयसीआयसीआय

  • बँक ऑफ इंडिया

  • स्टेट बँक ऑफ इंडिया

  • आयडीबीआय

  • पंजाब नॅशनल बँक

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया

  • सुवर्णयुग सहकारी बँक

  • सोपानकाका सहकारी बँक

  • विश्‍वेश्‍वर सहकारी बँक

  • प्रेरणा सहकारी बँक

  • टीजेएसबी सहकारी बँक

  • साधना सहकारी बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT