Save_Life_Group 
पुणे

'त्यांच्या मैत्रीला सलाम!'; कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मशिनची सुविधा देतात एकदम फ्री!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक रुग्णांना बेडची सुविधा उपलब्ध होत नव्हती. तर काहींना तातडीने ऑक्सिजनची गरज भासत होती. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही ताण येत होता. या परिस्थितीमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून वारजेतील तरुणांनी एकत्र येऊन काही ऑक्सिजन मशीन विकत घेतल्या. तसेच गंभीर रुग्णांना हे ऑक्सिजन मशीनची सुविधा मोफत देण्यास सुरुवात केली.

याबाबत माहिती देताना अरविंद हाबडे म्हणले, "शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू होत असल्याचे समोर येत होते.  तसेच या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णालयातील खर्च, बेडचा अभाव सारख्या वेगवेगळ्या समस्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना असल्याचे दिसून आले. तेव्हा आपण यासाठी प्रयत्न सुरू करायला हवा याची जाणीव झाली. यासाठी माझ्या काही मित्रांना एकत्र केलं आणि या समस्येवर उपाय म्हणून ऑक्सिजनच्या मशीन विकत घेण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत पैसे जमा केले आणि दोन ऑक्सिजनच्या मशीन घेतल्या. रुग्णालयात बेड मिळेपर्यंत घरीच क्वॉरंटाईन झालेले तसेच रुग्णालयातून घरी आल्यावर गरज पडल्यास हे मशीन रुग्णांना देतो.

काही रुग्ण दोन तर काही दहा ते बारा दिवसांसाठी या मशीनचा वापर करतात. यासाठी आम्ही 'सेव्ह लाईफ' हा वॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून भोसरी, हडपसर, कोंढवा, वारजे, कर्वेनगर अशा शहरातील वेगवेगळ्या परिसरात गरज असलेल्या रुग्णांना ही मशीन पोहोचविली जाते. आमच्या या मोहिमेला आता एक महिना पूर्ण झाला असून आमच्याकडे सध्या पाच मशीन आहेत. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 25 रुग्णांना ऑक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या आणखीन तीन मशीन विकत घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे."

या अनोख्या उपक्रमात हाबडे यांच्या बरोबर दिनेश गोळे, विश्राम ढोले, सुधीर मोरे, नंदलाल नित, संतोष घोसाळे, आनंद सावंत, अमीर शेख, शंकर बोडके, अशोक खत्री आणि दिनेश गोळे यांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

IND vs SA: यशस्वी जैस्वालने केलं संधीचं सोनं, वनडेत झळकावलं पहिलं वहिलं शतक; विराट, रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Mercedes accident Video: भरधाव मर्सिडिज दुभाजकाला धडकून रॉकेटसारखी दोन कार वरून उडाली अन्...

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : - सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

SCROLL FOR NEXT