Students_Exams
Students_Exams 
पुणे

महत्त्वाची बातमी: बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे.

पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विषयांचे प्रश्नसंच काढण्यापासून ते ऑनलाइन पद्धतीतील त्रुटींमुळे परीक्षेमध्ये अडचणी आल्या होत्या. या अडचणी बॅकलॉकच्या परीक्षेमध्ये येऊ नये, यासाठी विद्यापीठाने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. बॅकलॅगच्या परीक्षेत सुमारे २ हजार २०० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच ते पावणेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

परीक्षा विभागाने काही दिवसांपूर्वी या परीक्षा संदर्भात परिपत्रक काढून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा सराव करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल, असेही परिपत्रकात नमूद केले होते केले होते. मात्र, या वेळापत्रकात काहीसा बदल होत आहे. 

३ ते ६ डिसेंबर या कालावधीत सराव परीक्षा होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यवस्थित लॉगिन होते का? त्यांचा ई-मेल आयडी बरोबर आहे की चूक आदी गोष्टींची पडताळणी होणार आहे. यातून ज्या त्रुटी समोर येतील, त्या त्रुटी ७ डिसेंबरपर्यंत दूर करून ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.

"३ डिसेंबर ते ६ डिसेंबरमध्ये सराव परीक्षा होईल, तर ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठ घेईल. फक्त  २०१३ च्या पॅटर्नच्या कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT