Students 
पुणे

पुणे विद्यापीठाचं ठरलं! परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन केलं जाहीर

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा ही महाविद्यालयात कॉम्प्युटर लॅबमध्ये न घेता विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, लॅपटॉपवर घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाणार असल्याने तांत्रिक आणि आर्थिक मुद्दे उपस्थित झाले आहे. त्यावर चर्चा सुरू असून, याचा निर्णय होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने परीक्षेचे परिपत्रक काढण्यास विबंल होत असल्याचे समोर आले आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत प्रथम वर्षाची ३० मार्च तर द्वितीय ते अंतिम वर्षापर्यंतची प्रथम सत्र परीक्षा १५ मार्चपासून ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे. त्यामध्ये परीक्षा वैयक्तिक मोबाईल, लॅपटॉपवर होणार की महाविद्यालयांमध्ये याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये परिपत्रक काढून जाहीर केला जाईल, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप परिपत्रक आलेले नाही.

उपसमितीच्या सदस्यांची एक बैठक झाली असून, त्यात महाविद्यालयात परीक्षा घेतल्यास गर्दी होईल. सध्या ५० टक्केच उपस्थितीला परवानगी आहे, त्यामुळे या नियमाचे उल्लंघन होऊ शकते आणि अनेक विद्यार्थी घरी असल्याने त्यांची गौरसोय होऊ शकते. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांची घरबसल्या परीक्षा घ्यावी. येत्या दोन तीन दिवसात उपसमितीची दुसरी बैठक अहवाल सादर केला जाईल, असे उपसमितीचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर होईल. त्यासाठी फ्रंन्ट कॅमेरा असणे अनिवार्य असणार आहे.

अंतिम वर्षाचा पेच
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीची मुदत एका वर्षाची आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची प्रथम सत्राची परीक्षा ७० गुणांची घेतली जाणार आहे. त्यामध्ये ५० गुण हे बहुपर्यायी प्रश्‍नांना (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्यू) असतील. तर २० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एका कागदावर प्रश्‍नांची उत्तरे लिहून त्याचा फोटो काढून, त्याचा क्युआर कोड अपलोड करायचा आहे.

यासाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार सध्याची एजन्सी काम करण्यास तयार आहे का? प्रति विद्यार्थी खर्च वाढणार का? यापूर्वीच निश्‍चित केलेल्या दरांमध्ये परीक्षा घेणार का? यावर अद्याप चर्चा सुरू आहे. तो पर्यंत परिपत्रक निघण्याची प्रतिक्षा विद्यार्थी व महाविद्यालयांना करावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT