पुणे : दहावीनंतर तीन वर्षांच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 ऑगस्टपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच यंदा विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटनीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दहावीनंतर तीन वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी (शैक्षणिक वर्ष 2020-21) ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. याबरोबरच कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे असे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
सद्यःस्थितीत पदविका प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या सुविधा केंद्रांवर इच्छुक विद्यार्थी आणि पालकांची गर्दी टाळण्यासाठी "ई-स्क्रुटनी'ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून "ई-स्क्रुटनी' पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. यामध्ये विद्यार्थी कोणत्याही ठिकाणाहून इंटरनेटशी जोडलेल्या संगणकावरून ऑनलाइन अर्ज भरतील, तो सबमिट करतील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील. तसेच विद्यार्थ्यांना अर्जाच्या पडताळणी आणि निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे पडताळले जातील आणि निश्चित केले जातील.
तसेच विद्यार्थी मोबाईलवरून अथवा संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून "प्रत्यक्ष स्क्रुटनी' पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. यात विद्यार्थी त्यांच्या सर्वांत जवळील सुविधा केंद्रावर जाऊन पुढील प्रक्रियेसाठी तारीख व वेळ ठरवून घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :
"http://poly20.dtemaharashtra.org ''
पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक :
प्रक्रिया : वेळापत्रक
- संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे : 25 ऑगस्टपर्यंत
- प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : 25 ऑगस्टपर्यंत
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : 28 ऑगस्ट
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्या, त्या सादर करणे : 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान
- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : 2 सप्टेंबर
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धत निवडणारे उमेदवार राज्य सरकारने कोविड-19 संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
- नियुक्त केलेल्या सुविधा केंद्रांवर सामाजिक अंतर राखणे तसेच त्याठिकाणी इच्छुक उमेदवार व पालकांची गर्दी टाळणे आवश्यक
- ऑनलाइन भरलेल्या अर्जाची त्याने निवड केलेल्या ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीद्वारे अर्ज निश्चित करण्यास अपयशी ठरल्यास ते अर्ज नाकारले जातील. अशा विद्यार्थ्यांची नावे प्रवेश प्रक्रियेसाठी तयार केलेल्या कॅप तसेच नॉन कॅप गुणवत्ता यादींमध्ये दिसणार नाहीत.
- प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रांवर कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची टिप :
- राज्य मंडळ, आयसीएसई आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती पुस्तिकेमध्ये "एकूण गुण' ही संज्ञा स्वतंत्रपणे परिभाषित केली आहे.
- उमेदवारांच्या निकालांमध्ये अक्षरी ग्रेड वाटप केले असल्यास अशा उमेदवाराने अर्ज सादर करतानाच्या वेळी संबंधित सक्षम प्राधिकरण किंवा बोर्डाकडून अक्षरी ग्रेडचे समकक्ष गुणांमध्ये रुपांतरणाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या समकक्ष गुणांच्या आधारे पात्रतेचा निर्णय केला जाईल.
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.