The schedule of university examinations will be announced in two days 
पुणे

मोठी बातमी! विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसात होणार जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेताना पदवी व पदव्युत्तरच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा द्यावी आणि प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 'कॅरी फाॅरवर्ड' योजना लागू करून पुढील वर्षात प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षांसाठी नियमावली जाहीर केली तसेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालावर उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा १  ते १५ जुलै दरम्यान घेता येतील का?, त्यांचा निकाल १५ ऑगस्ट पर्यंत जाहीर करून  १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? तसेच 'कॅरी फॉरवर्ड' योजना लागू करून प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल का या शक्यतेवर बैठकीत चर्चा झाली.  

एम.फिल व पी.एचडीच्या व्हायवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घ्याव्यात, लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करण्याची मुदत संपली त्यांना मुदतवाढ देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. 

स्थगित केलेल्या परीक्षांचे काय? एमपीएसीकडून खुलाशाची मागणी

"विद्यापीठाच्या परीक्षा घेताना एकाही विद्यार्थाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही त्यादृष्टीने विचार केला  आहे. या परीक्षांता अंतीम निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर केला जाईल. "
- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

Nepal Royal Massacre: कशी संपली होती नेपाळची राजेशाही ? राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या अन्..

T20 World Cup 2026 Date: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख आली समोर, फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर...१५ संघ पात्र, ५ जागा शिल्लक...

Bandu Andekar: आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर… कोर्टात बंडू आंदेकराचा मोठा दावा; युक्तिवादाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT