Pune University sakal
पुणे

Pune University : पीएचडीच्या २० विद्यार्थ्यांनाच पाठ्यवृत्ती ; सुमारे दीड हजार संशोधक विद्यार्थी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वतःच्या निधीतून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएचडीच्या फक्त २० विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती दिली आहे. मागील वर्षी हाच आकडा चक्क शून्यावर होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वतःच्या निधीतून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएचडीच्या फक्त २० विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती दिली आहे. मागील वर्षी हाच आकडा चक्क शून्यावर होता. दीड हजारांच्या आसपास संशोधक विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध विभागांत आहे. मात्र, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापीठाच्या योजना सध्या रखडल्या आहेत.

शनिवारी (ता. २३) झालेल्या अधिसभेमध्ये सदस्य डॉ. रमेश गायकवाड आणि शंतनू लामधाडे यांनी संशोधन पाठ्यवृत्तीविषयी प्रशासनाला प्रश्‍न विचारले आहेत. त्यांच्या लेखी उत्तरांत संशोधनाबाबत विद्यापीठाची उदासीनता स्पष्ट दिसून येत आहे. विद्यापीठ फंडातून सध्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पाठ्यवृत्ती मिळत नाही. फार तर पोस्ट डॉक्टर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोड्या प्रमाणात पाठ्यवृत्ती प्राप्त होते. लामधाडे सांगतात, ‘विद्यापीठ आवारात एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संशोधन करतात. नवीन शैक्षणिक धोरण संशोधनाभिमुखतेला समर्पित असून, संशोधक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठ्यवृत्तीचा विचार आणि योजना विद्यापीठाकडे असणे गरजेचे आहे. इतर संस्थांकडून मिळणाऱ्या संशोधन पाठ्यवृत्ती योजना बारगळल्या आहेत. दर्जेदार संशोधनासाठी विद्यापीठाने पाठ्यवृत्तीबरोबरच प्रकल्पांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.’

आकडे बोलतात

  • विद्यापीठ विभागातील एकूण पीएचडी व ‘पोस्ट डॉक’चे विद्यार्थी : १,४४१

  • विद्यापीठ निधीतून पाठ्यवृत्ती मिळणारे ‘पोस्ट डॉक’चे विद्यार्थी : १३

  • भारतरत्न जेआरडी टाटा फेलोशिप मिळणारे : २०

विद्यापीठ निधीतून वितरित होणारी शिष्यवृत्ती

वर्ष पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी पीएचडीचे विद्यार्थी

२०२२-२३ ५८२१ ०

२०२३-२४ ९३९ २०

प्रशासनाकडे आकडेवारीच नाही

विद्यापीठात दीड हजारांच्या आसपास संशोधक विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना शिष्यवृत्ती मिळते का नाही, विभागवार त्यांची संख्या किती, प्रकल्पांची संख्या, त्यांना मिळणारा निधी याची पुरेशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे नसल्याचे प्रथमदर्शनी वाटते. कारण अधिसभा सदस्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात माहिती दिली असून, उत्तरांत सविस्तर आकडेवारीचा अभाव दिसतो.

फक्त ६९ प्रकल्प

विद्यापीठात ३८ पेक्षा अधिक विभाग असून, प्रकल्पांची संख्या फक्त ६९ आहे. एकेकाळी विद्यापीठातील विभागांना अनेक मान्यवर संस्थांसह उद्योगांकडून प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता. पण दिवसेंदिवस वाढत जाणारी उदासीनता आणि उपयोजित संशोधनाच्या अभावामुळे अनेक संस्थांकडून प्रकल्प येणे बंद झाले आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ प्राध्यापकांनी दिली. प्राध्यापकांची रिक्त पदे आणि उद्योगाभिमुख संशोधनाच्या अभावामुळे ही स्थिती अधिक ग्‍ांभीर होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने तातडीने उद्योगांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरण निर्मिती आणि विभागांनी उपयोजित संशोधन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT