पुणे

शिरूर : टॅंकरच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू

नितीन बारवकर

शिरूर : स्वीफ्ट मोटारीच्या धडकेने मोटारसायकलवरून खाली पडलेला शाळकरी मुलगा दूधाच्या टॅंकरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. शिरूर शहरातून जाणा-या पुणे - नगर रस्त्यावर इंदिरा गांधी पुतळ्याजवळ, आज दुपारी तीन च्या सुमारास हा अपघात झाला.

आयुष दादाभाऊ जाधव (वय ९, रा. जुने शिरूर, रामलिंग, ता. शिरूर) असे या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. शाळा सुरू झाल्याने शालेय साहित्य व नवीन वर्षाच्या खरेदीसाठी आयुष वडीलांसोबत आज दुपारी शिरूर शहरात आला होता. या अपघातप्रकरणी, नितीन दौलत जाधव (रा. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टॅंकर चालकासह स्वीफ्ट मोटारीच्या चालकावरही शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अपघातानंतर, टॅंकरचालक टॅंकर जागेवरच सोडून तर; स्वीफ्टचालक स्वीफ्ट मोटारीसह पळून गेला. दोघांवरही शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाभाऊ गंगाराम जाधव (रा. जुने शिरूर) हे किरकोळ खरेदीसाठी मुलगा आयुष याला घेऊन आज दुपारी, आपल्या दूचाकीवरून (क्र. एमएच १२ एमडी ३७१२) शिरूर शहरात आले होते. इंदिरा गांधी पुतळ्याजवळून तहसिलदार कार्यालयाकडे जात असताना मागून आलेल्या स्वीफ्ट मोटारीची त्यांच्या दूचाकीला मागच्या बाजूने धडक बसली. या धडकेने दूचाकीवरील त्यांचा ताबा सुटल्याने ते आयुष यांच्यासह रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागील बाजूने आलेल्या दूधाच्या टॅंकरच्या (क्र. एमएच १६ एवाय ९१५५) चाकाखाली मुलगा आला. यात त्याच्या डोक्याला व हातापायांना गंभीर मार लागल्याने स्थानिक तरूणांनी त्याला टॅंकरच्या चाकाखालून काढून खासगी रूग्णालयात नेले, मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

शिरूर शहरातून जाणारा पुणे-नगर रस्ता अरूंद असून रस्त्याच्या दूतर्फा अत्यंत बेशिस्तीने वाहने लावलेली असतात. शहरातील वाहतूक कोंडीचा आणि बेशिस्तीचा मुद्दा या अपघातातील एका शाळकरी मुलाच्या मृत्यूमुळे आज पुन्हा चव्हाट्यावर आला. गतवर्षी डिसेंबर महिन्यातही याच परिसरात वाळूच्या ट्रकखाली सापडल्याने निमगाव भोगी येथील तरूणाला जीव गमवावा लागला होता.

शहरातील वाहणांची वाढती वर्दळ, त्यातच दूतर्फा झालेली अतिक्रमणे विविध व्यावसायिकांचे स्टॉल आणि रस्त्याकडेला उभी असलेली वाहने हे दीव्य पार करूनच इतर वाहन चालकांना वाहने पुढे न्यावी लागतात. मात्र, या वाढत्या बेशिस्त वाहतूकीकडे पोलिसांचे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप अपघातस्थळी संतप्त तरूणांनी केला.

(संपादन : सागर डी. शेलार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT