sakal
पुणे

इंदापूर: गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

इंदापूर शहर व परिसरात दि. ४ ऑक्टोबर रोजी शाळेची घंटा वाजल्यानंतर १४३ शाळा शासन निर्देशानुसार सुरू झाल्या.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर शहर व परिसरात दि. ४ ऑक्टोबर रोजी शाळेची घंटा वाजल्यानंतर १४३ शाळा शासन निर्देशानुसार सुरू झाल्या. शहरातील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंग्लिश व मराठी मिडीयम विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प व मास्क देत गटशिक्षणा धिकारी राजकुमार बामणे, मुख्याध्यापक विकास फलफले, प्राचार्या फौजिया शेख व सुप्रिया आगरखेड, शिक्षकांनी केले.

यावेळी राजकुमार बामणे म्हणाले, दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार शाळा सुरू झाल्या असून उपचारात्मक पद्धतीने जून महिन्यापासूनचा अभ्यासक्रम प्राधान्याने शिकवला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शासकीय नियमानुसार शहरी भागातील शाळांचे आठवी पासूनचे वर्ग ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यासंदर्भातझालेल्या शासन निर्णयानुसार विद्यालयातील ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, पर्यवेक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांचेगुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.यावेळी विजय धेंडे ,नारायण व्यवहारे, अंकुश फुले,बाबासाहेब साळुंके, प्रकाश पापत, संजय गायकवाड, निळकंठ शिंदे, ग्रंथपाल पुष्पा लोंढे इत्यादी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT