School_Students 
पुणे

पुणे : शाळांचे टाळे सोमवारी उघडणार; मनपा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्यातील शाळांना टाळे लागलेले आहे, पण अखेर शाळा सोमवारपासून (ता.4) उघडणार असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने नियमांचे पालन करत शाळा पुन्हा गजबजणार आहेत. पूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

राज्यभरातील इयत्ता 9वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पुणे शहरातील शाळा कोरोनाच्या उद्रेकामुळे आणि पालकांच्या विरोधामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. डिसेंबर महिन्यात 13 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पण 10 टक्केपेक्षा कमी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतिपत्र दिले. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली होती.

महापालिका आयुक्त कुमार यांनी काही दिवसांपूर्वी 4 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच शाळांमधील शिक्षकांना आता तिसऱ्या वेळेस कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे यंत्रणेवर देखील ताण निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन शाळा सुरू करण्याबाबत महापालिकेची तयारी झाली आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त कुमार यांनी पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतचा आढावा घेऊन तारीख शनिवारी जाहीर केली जाईल असे सांगितले होते. त्याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, "शाळा सुरू करण्याबाबत आम्ही जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.''

शाळा समंतिपत्रांचे प्रमाण वाढेल
पुणे महापालिकेच्या 44 शाळांमधील 8 हजार 759 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 835 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतिपत्र दिले आहेत. शनिवारी यामध्ये वाढ झालेली नाही, पण शाळा सुरू झाल्यानंतर संमतिपत्र देण्याचे प्रमाण वाढेल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT