Students_Admission
Students_Admission 
पुणे

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे कोणतीच सुविधा नसेल, तर अजिबात‌ चिंता करू नका. अर्ज भरण्यासाठी तुमच्या दहावीच्या शाळेशी संपर्क साधा. तुमचा अर्ज त्या शाळेतून ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने होते. आतापर्यंत एखाद्याकडे संगणक, इंटरनेट नसेल, तर तो विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू शकत होता, पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सायबर कॅफेमध्ये‌‌ अनेकांना जाता येत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे अर्ज भरण्यासाठी कोणतीच‌ सुविधा नाही, त्यांनी अर्ज कसा‌ भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया‌ समितीने हा‌ प्रश्न सोडविला आहे.

सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी 'सकाळ'ला सांगितले की, विद्यार्थी दहावीमध्ये ज्या शाळेत शिकत होता, तिथे त्याला ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्यासंबंधी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या‌ मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याकडे वा त्याच्या पालकांकडे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणतीही सुविधा नसेल, त्यांना शाळेशी संपर्क साधावा. कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये याची काळजी घेतली जात आहे. एखाद्या शाळेत‌ दहावीला शंभर विद्यार्थी‌ असतील, तर त्या सर्वांनी अकरावीचा अर्ज भरला की नाही, यावर नजर ठेवण्याच्या‌ सूचना देखील शाळांना दिलेल्या आहेत.

शाळेत जाऊन अर्ज भरता‌ येत‌‌ नसेल, तर विद्यार्थी घराजवळील मार्गदर्शन केंद्रावर जाऊनही अर्ज भरू शकतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दी बाहेरील विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अर्ज भरता‌ येणार आहे. परंतु कोरोनाच्या‌ काळात कोणत्याही विद्यार्थ्याला वा पालकांना घराबाहेर पडण्याची गरज भासू नये, अशी व्यवस्था‌ करण्यात आली आहे, असे शेंडकर यांनी स्पष्ट केले.

अकरावीचे‌ ऑनलाइन अर्ज‌ हे आता प्रवेशाच्या‌ संकेतस्थळावरच‌ नव्हे; तर मोबाइलवरूनही भरता येणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अॅप तयार केला असून,‌ तो उद्यापासून कार्यान्वित‌ केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या‌ंच्या‌ हस्ते उद्या शनिवारी (ता.१) मुंबईत या अॅपची सुरवात केली जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

महाराष्ट्र, पुणे पिंपरी चिंचवड शिक्षण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT