सायन्स पार्क, पर्यावरण विभाग (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) - भल्या मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्राबद्दलचं कुतूहल शमवताना मुलं.
सायन्स पार्क, पर्यावरण विभाग (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) - भल्या मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्राबद्दलचं कुतूहल शमवताना मुलं. 
पुणे

बोलणारं झाड आणि आवाज बंद करणारा पिंजरा (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे - ती मुलगी बोलत होती आणि तिचा आवाज समोरच्या पडद्यावर लाल रंगात नाचत होता. पलीकडे असलेलं झाड त्याच्यावर आणि सभोवती असलेल्या जीवाची माहिती सांगत होतं. भल्या मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून मुलं काय काय बघत होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील ' सायन्स पार्क'मध्ये मुलं विज्ञानाच्या गमतीजमतीत रमली होती. आपल्या शरीराचा तपशील इथं ठेवलेल्या अवयवांच्या प्रतिकृतींमधून मिळतो. कानाच्या प्रतिकृतीचा बाह्यकर्ण व अंतर्कर्ण पाहून आपल्या कानाची रचना कळते. निरनिराळ्या सांध्यांच्या प्रतिकृतींमधून रंजक माहिती मिळते. बोलका सापळा शरीरातील सर्व हाडांची गोष्ट सांगतो. 

छान गाणं वाजत असलेला ट्रांझिस्टर एका पिंजऱ्यात टाकताच आवाज बंद होतो. काही ठिकाणी मोबाइल का लागत नाही, यामागचं विज्ञान इथं मुलांना समजावून सांगितलं जातं. आपण बोलताना आवाज दिसत नाही, पण इथं तो पाहता येतो. या केंद्राचे संस्थापक  समन्वयक डॉ. डी. जी. कान्हेरे म्हणाले, "आमच्या केंद्रात मुलं प्रयोगांमधून हसतखेळत विज्ञानाशी दोस्ती करतात. इथं असलेल्या संग्रहालयातून वनस्पती, पक्षी, प्राणी व माणसाची शारीरिक रचना आणि कार्यपद्धतीची मजेमजेत ओळख होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT