Accident
Accident Sakal
पुणे

टेम्पोच्या धडकेत स्कूटरचालकाचा मृत्यू; अपघातानंतर टेम्पोचालक गेला पळून

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची स्कूटरचालकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.

उंड्री - फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची (Tempo) स्कूटरचालकाला (Scooter Driver) धडक (Dash) बसून अपघात (Accident) झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने मृत्यू (Death) झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला.

नवनाथ रामचंद्र जाधव (वय ४१, रा. सप्तश्री अपार्टमेंट, फुरसुंगी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. नागेश जाधव (वय ३८, रा. माऊली पाडाळे, म्हाळुंगे गावठाण, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फुरसुंगी-सासवड रस्त्यावर फिर्यादीचे भाऊ नवनाथ जाधव यांना विरुद्ध दिशेने भरधाव टेम्पोची धडक बसून अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक न थांबता पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बिडवे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT