Corona-Virus 
पुणे

चिंताजनक; सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात आढळले दोनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण!

सकाळ वृत्तसेवा

Corona updates: Pune City : पुणे : पुण्यात आपल्या वाढीचा वेग दुसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारीही (ता.१७) कायम ठेवल्याने दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या आठवड्यात पुणेकरांच्या आशा वाढविलेल्या कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊन दिवसभरात ५३ बरे झाले आहेत. तर जवळपास दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि मृतांचे आकडे वाढल्याने पुणेकरांत पुन्हा भीती वाढली आहे.

सध्या रोज दीडशे हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण, कोरोनामुक्तांची रविवारी कमी झाली असली तरी, एरवी ती आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते. तेव्हा कोरोनामुक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने पुणेकरांमधील भीती कमी झाली होती. मात्र, शनिवारपासून अचानक नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यात पुन्हा २०१ रुग्ण वाढले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले ९ जणांचा मृत्यू झाला; पुणे शहरात तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३ हजार ४९६ जणांना कोरोना झाला आहे.

मात्र, १,७५१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, ते आपापल्या घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत १५१५ रुग्ण असून, त्यात आज सापडलेल्या २०१ रणांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, १४१ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यापैकीचे ४५ रुग्ण अत्यवस्थ स्थितीत आहेत.

आणखी वाचा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT