corona1 
पुणे

कोरोनाच्या एका दिवसाच्या लक्षणानंतर रुग्णाचा मृत्यू

अमर परदेशी

पाटस (पुणे) : दौंड तालुक्यातील पाटस येथे आज (ता. 17) दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबधित रुग्णांपैकी साठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एका महिलेवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.

पाटसमधी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला काल (ता. 16) सकाळी अचानक सर्दी, खोकला, ताप आदीचा त्रास भेडसावू लागला. त्यांनी पाटस येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयित लक्षणे वाटल्याने त्यांना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेत घशातील द्रव्याचे नमुने दिले. त्यानंतर ते घरी परतले. आज सकाळी त्यांना पुन्हा त्रास भेडसावू लागला. त्यांनी संबधित खासगी दवाखान्यात धाव घेतली. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी दौंड येथे पाठविण्यात आले. त्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबाबत सर्वच अनभिज्ञ असताना दुपारी प्राप्त झालेल्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार त्यांना कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. संबधित व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रासगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गावात आणखीन एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला देखील कोरोना संसर्ग झाल्याचे दुपारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार निष्पन्न झाले. संबधित महिलेला दोन दिवसांपासून सर्दी, खोकला व तापाची लक्षणे होती. खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर काल त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सध्या महिलेवर बारामती येथे उपचार सुरू आहेत. गावात 2 कोरोना रुग्ण व त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्ण सापडलेला भाग काही अंतरापर्यंत सील करण्याचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी विशेष काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडणे टाळावे, तोंडाला मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य सेवक भीमराव बडे व सरपंच संभाजी खडके यांनी केले आहे.

Edited By : Nilesh J. Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT