पुणे

थरथरणाऱ्या हातांना नाही ‘आधार’

सकाळवृत्तसेवा

पुणे -  हयातीचा दाखला मिळविण्यासाठी बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) आधार कार्डशी जुळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मिळविण्यासाठी ससेहोलपट होत आहे. दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था बॅंकांमध्ये नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.

ज्या ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे उमटत नाहीत, अशा नागरिकांना बॅंका एक अर्ज भरून देतात आणि तो अर्ज घेऊन त्यांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयात हयातीचा दाखला मिळविण्यासाठी पाठविले जाते; परंतु यावर्षीपासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने हयातीचा दाखला देण्याचे काम बंद केले आहे. हे काम खासगी एजन्सीकडे देण्यात आले आहे. तिथे त्यांच्या डोळ्यांची नोंदणी करून घेऊन हयातीचा दाखला दिला जातो; परंतु या खासगी एजन्सीचे पत्ते शोधणे ज्येष्ठ नागरिकांना अचडणीचे ठरत आहेत. या एजन्सी शोधल्यानंतरही दाखल्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी ज्येष्ठ नागरिक करत आहेत. शासनाने १९९५ मध्ये सुरू केलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. यासाठी आवश्‍यक असणारा हयातीचा दाखला संबंधित बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. यासाठी बोटांचे ठसे घेतले जातात आणि हे ठसे आधार कार्डशी जुळतात का, हे पाहिले जाते; परंतु वयोमानानुसार अनेकांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने ते आधार कार्डशी जुळत नाहीत. या व्यतिरिक्त कॅमेऱ्याद्वारे डोळ्यांची नोंदणी घेण्याची व्यवस्था कुठल्याच बॅंकेकडे नाही. त्यामुळे वारंवार हेलपाटे घालूनही या थरथरणाऱ्या हातांना आधार कार्डाचाही आधार मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली.

बोटांचे ठसे जुळत नसतील तर डोळ्यांची ओळख पटविण्याची व्यवस्था बॅंकेमध्ये नाही. ही व्यवस्था आम्हाला बंधनकारक नसल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. 
- सतीश पोरे, ज्येष्ठ नागरिक.

बॅंकांचे हात वर
बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी बायोमेट्रिकसाठी बोटांचे ठसे घेण्याव्यतिरिक्‍त इतर व्यवस्था नसल्याचे सांगितले. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तर तीही व्यवस्था नाही. ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जातात आणि तेच अर्ज घेऊन त्यांना पीएफच्या कार्यालयात पाठवले जाते; परंतु बॅंकांना डोळ्यांची नोंदणी करण्याची व्यवस्था सुरू करणे बंधनकारक असल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने सर्व बॅंकांना सूचना दिल्या असून, या संदर्भात शासन परिपत्रकही काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बॅंका आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अनागोंदीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल.
बॅंकांमध्ये बायोमॅट्रिकसाठी डोळ्यांची नोंदणी करण्याची व्यवस्था बंधनकारक.
खासगी एजन्सीकडून हयातीचा दाखला देण्यासाठी नियमापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT