Pune-Crime
Pune-Crime 
पुणे

धक्कादायक ! सुखी आयुष्याला कंटाळून पुण्यातील दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पतीचा मृत्यू

ब्रिजमोहन पाटील

पुणे : आयुष्यातील दु:ख, नैराश्यातून अनेकजण आत्महत्या करतात, पण सगळे चांगले सुरू असतानाच, आपले आता काही काम नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करून जीवन संपवून टाकू, असा विचार करून आत्महत्या करण्याचा निर्णय ज्येष्ठ दांपत्य घेतला. यात वृद्धाचा मृत्यू झाला, तर जखमी अवस्थेतील महिलेला पोलिसांनी वेळीच दवाखान्यात नेल्याने तिचे प्राण वाचले. दिवाळी तोंडावर आलेली असताना मंगळवारी (ता.22) ही धक्कादायक घटना घडल्याने सुखसागरनगर परिसरात खळबळ उडाली आहे. 

जानकीबाई आणि वसंतराव (दोघांचेही नाव बदललेले) हे वृद्ध दांपत्य. वसंतराव हे शासकीय नोकरीतून सेवा निवृत्त झालेले होते. तर त्यांची पत्नी जानकीबाई या गृहिणी आहेत. त्यांना दोन उच्चशिक्षित विवाहित मुली आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. त्या त्यांच्या घरी आनंदी आहेत. आपल्या आयुष्यात सर्वकाही चांगले झाले आहे. त्यामुळे जगण्याचा हेतू पूर्ण झाला आहे. आता तब्येत ही व्यवस्थित आहे, पण भविष्यात आजारपण सुरू झाले, तर त्याचा सर्वांनाच त्रास होईल, आजारी पडून मारण्यापेक्षा चांगले असतानाच जीवन संपवून टाकू, अशी चर्चा वसंतराव आणि जानकीबाई यांच्यात झाली. आत्महत्या करून जीवन संपविण्यासाठी त्यांच्या डोक्यात काही दिवसांपासून विचार घोळत होता. आपल्या मृत्यूनंतर याचा कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली. 

मंगळवारी घरात आत्महत्या करण्याचे निश्चित केल्यानंतर वसंतराव यांनी त्यांच्या पुतण्याला "आम्ही आत्महत्या करत आहोत" असा मेसेज पाठवला. त्यानंतर जानकीबाई यांनी हाताची नस कापून आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू झाला असे समजून वसंतराव यांनी त्यांचा मृतदेह खाली घेतला. त्यानंतर स्वतः गळफास घेतला. वसंतराव यांनी पाठवलेला मेसज वाचून त्यांच्या पुतण्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी त्वरीत 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला ही माहिती दिली. 

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी एस. आर. यादव व शशिकांत भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात घुसून पाहिले असता, जानकीबाई जमिनीवर पडल्या होत्या, तर वसंतराव यांनी गळफास घेतल्याचे पाहिले. त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच वसंतराव यांचा मृत्यू झाला. तर जानकीबाई या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलीने, नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. 
घरात सर्वकाही चांगले सुरू असताना, विनाकारण हे संकट ओढावल्याने त्यांच्या नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT