Senior man dies in bullet and Two Wheeler Accident 
पुणे

भरधाव बुलेटची दुचाकीला धडक; जेष्ठ नागरीकाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव बुलेटने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. वारजे पोलिसांनी बुलेट चालविणाऱ्या तरुणास अटक केली. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता वारजे माळवाडी येथील नवनाथ रसवंतीगृहासमोर घडली. 

घुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

शुभम बाळासाहेब पाटील (वय 25, रा. दळवीनगर, आंबेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या बुलेट चालविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात भानुदास रामचंद्र पंडीत (वय 65, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) असे अपघातात मृत्यु झालेल्या नागरीकाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील निढाळकर (वय 48, रा. कुडजे, हवेली) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भाच्याचे सासरे भानुदास पंडीत हे त्यांच्या दुचाकीवरुन वारजे पुलाकडून एनडीए रोडने गणपती माथ्याकडे जात होते. त्यावेळी शुभम पाटील हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत त्याच्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगात चालवित होता. पंडीत यांची दुचाकी नवनाथ रसवंतीगृहासमोर आली. त्याचवेळी पाटील याच्या भरधाव बुलेटने पंडीत यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये खाली पडून पंडीत यांना जबर दुखापत झाली. त्यांनी डोक्‍यावर हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्या डोक्‍याला मार बसला. त्यामुळे पंडीत यांचा मृत्यु झाला. 

विद्यार्थ्यांनो, All The Best; दहावीची परीक्षा उद्यापासून
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT