Accident 
पुणे

पुणे : डम्परच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; कोथरूड डेपोजवळची घटना

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : डम्परच्या धडकेने शारदाबाई पंडित कांबळे (वय 63, रा. दत्तनगर, कात्रज) या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या भुसारी काॅलनीमध्ये पाच घरी घरकाम करायच्या. त्यांच्यामागे पती, दोन मुले, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. 

सर्व कामे आटोपून त्या घरी निघाल्या होत्या. कोथरूड डेपोजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव डम्परने त्यांना उडवले. अपघात झाल्यामुळे काही वेळासाठी या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवत परिस्थिती नियंत्रणात आणली. डम्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोथरूड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

अविनाश दंडवते म्हणाले की, कांबळे मावशी खूप वर्षांपासून आमच्या घरी काम करत होत्या. त्यांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला होता. दोन वर्षांनी गावी जाऊन शेती करण्याचा त्यांचा मनोदय होता. त्यांच्या जाण्याने एक देवमाणूस आम्ही गमावला आहे.

गणेश वरपे म्हणाले की, या भागात वेगवान वाहनांमुळे रस्ता ओलांडणेसुद्धा कठीण असते. येथील वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी पोलिसांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. सदरचा चालक नशेत होता का याची तपासणी करावी, अशी मागणी वरपे यांनी केली.

108 चा असाही अनुभव 
अपघाताची घटना दिसताच सचिन धनकुडे यांनी 108 नंबरला फोन केला. तेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती जिवंत आहे की, मृत अशी विचारणा करण्यात आली. 108 ची रुग्णवाहिका आली, परंतु अपघातग्रस्त महिला जागीच मृत झालेली असल्याने ते निघून गेले. नंतर शववाहिनी आली.

धनकुडे म्हणाले की, संबधित यंत्रणेला तातडीने कळवून मदतीची अपेक्षा सर्वसामान्य माणूस करतो, पण जेव्हा प्रतिप्रश्न विचारले जातात तेव्हा तो अचंबित होतो.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Update : कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक, 8.3 TMC ने पाणीसाठा वाढला; महाबळेश्वरात सर्वाधिक 400 MM पाऊस, नवजामध्ये किती?

वरंध घाटात बचावकार्य पाहणीला गेलेले अधिकारी, पोलीस; अचानक दरड कोसळली, बाजूला पळाल्यानं वाचले

Latest Marathi News Update: ताम्हिणीऐवजी पर्याय मार्गाचा वापर करा, पौड पोलिसांची नाकाबंदी

Missing Link: कनेक्टिंग लिंक’चा दर्जा मिसिंग? पहिल्याच पावसात स्लॅब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Bhoom FDA Raid: खवा नगरीत एफडीएचा छापा! भूममध्ये ६१ गोण्यांमध्ये साठवलेली दूध पावडर जप्त; प्रशासनाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT