corona
corona  
पुणे

शिरूरकरांची चिंता वाढली...उद्यापासून पाच दिवस "जनता कर्फ्यू'

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) :  शिरूर तालुक्‍यात आतापर्यंत आठ जणांना कोरोनाची बाधा व त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याने खेड्यापाड्यांतही भीतीचे सावट आहे. आतापर्यंत केवळ एक बाधित बरा झाला असून, इतरांवर उपचार चालू आहेत. त्यातच कारेगाव (ता. शिरूर) येथे ज्येष्ठ महिला बाधित झाल्याने शिरूरकरांची चिंता वाढली आहे.

या महिलेच्या संपर्कात शिरूर येथील दोघे आल्याचे स्पष्ट झाले असून, निघोज (ता. पारनेर, जि. नगर) येथील बाधितांचे काही नातेवाईक येथे असल्याचे समजल्याने शहरात उद्यापासून (ता. 16) पाच दिवस "जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. 

शिरूर तालुक्यात सणसवाडीत 24 मार्चला पहिला रुग्ण आढळला. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे परिसरात सात कोरोनाबाधित आढळले. त्यांच्या संपर्कातील बहुतांश जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले; तरी दोघांचा मृत्यू झाल्याने व इतरांवर अद्याप उपचार चालू असल्याने भीतीचे सावट कायम आहे. तालुका रेड झोनमध्ये असूनही फारशी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. फळे, भाजीपाला विक्रेत्यांचा राबता सर्वच भागात असून, बायपासला रोज संध्याकाळी भाजीपाल्याची घाऊक खरेदीविक्री होते. तेथे किमान 25 मोठी वाहने येतात. व्यवहारावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. 

शिरूर शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर लावलेले बांबू ट्रक, टेम्पो चालकांनी धडक मारून तोडले असून, तपासणी नाक्‍यांवरील पोलिस आठ दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे शहरात "आओ जाओ घर तुम्हारा' असेच चित्र आहे. अधिकाऱ्यांत कुठलाही ताळमेळ राहिलेला नसून, परप्रांतीयांना त्यांच्या प्रांतात पाठविणे एवढ्या एकाच कामांत सर्व अधिकारी गुंतल्याने इतर समस्या व कामे होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कारेगावची ऐंशी वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने आज गाव बंद करण्यात आले. आरोग्य पथक गावात दाखल झाले असून, संबंधित महिलेच्या कुटुंबीयांबरोबरच; त्यांच्या संपर्कातील 31 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

छातीत दुखत असल्याने नऊ मे रोजी या महिलेला शिरूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये आणले होते. परंतु, ह्रदयविकाराची लक्षणे आढळल्याने त्यांना नगरला हलवण्यात आले. तीन दिवस तेथे उपचारानंतर न्यूमोनियाचे निदान झाल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यांचे व कुटुंबीयांचे "कॉन्टॅक्‍ट' तपासले जात असून, त्यांना पुण्यातच उपचारादरम्यान, संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

कारेगावातील महिलेचे नातेवाईक शिरूर येथील बाबूराव नगर परिसरात राहात असून, ते त्यांच्या संपर्कात होते. तसेच, त्याच परिसरातील रुग्णालयात त्यांना नऊ मे रोजी दाखल करून एक दिवस उपचारही चालू होते. त्यामुळे नातेवाइकांसह संबंधित रुग्णालयातील 18 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, नगर परिषदेत तातडीने विचारविनिमय झाला. शहराच्या सर्व स्तरातील लोकांशी विचारविनिमय करून उद्यापासून (ता. 16) पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. या कालावधीत केवळ दवाखाने व त्याजवळचे मेडिकल स्टोअर चालू राहतील. इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT