पुणे

''सुरेश जाधव यांच्या वक्तव्याशी सीरमचा काहीही संबध नाही''

शरयू काकडे

पुणे : ''सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या वक्तव्याचा सीरमचा काहीही संबध नाही'' असे सांगत स्पष्टीकरण दिले आहे. सुरेश जाधव यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे ला सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी पत्र पाठवून हे स्पष्टीकरण दिले आहे. ''सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही'' असा खूलासा त्यांनी या पत्रातून केला आहे.

देशात लसीकरणाच्या तुटवड्यावरुन सुरेश जाधव यांनी भाष्य केले होते. ''लसीकरण सुरू करताना व्हॅक्सिनचा उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सकडे लक्ष दिलं गेलं नाही. स्टॉक नसल्याचं माहीत असूनही लसीकरण मोहीम राबवण्यात आली अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका केली होती. दरम्यान, ''जाधव यांच्या विधानासोबत आमचा काहीही भूमिका आता सीरमने स्पष्ट केली आहे. सीरमकडून असे कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. जाधव यांनी जे सांगितले ते कंपनीचे मत नाही'' असे स्पष्टीकरण प्रकाश कुमार सिंह यांनी सीरमचे सीईओ आदर पुनावला यांच्यावतीने सांगितले आहे.

''कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आम्ही सरकारसोबत आहोत.''असे सांगत आदर पुनवाला हे सीरमचे एकमेव अधिकृत प्रवक्ते आहेत'' असे या पत्रात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT