corona1 
पुणे

पुरंदरमागे कोरोनाची साडेसाती कायम, आणखी एवढ्या रुग्णांची भर 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनातून काल सातवा मृत्यू भिवडी येथील व्यक्तीचा झाला होता. तेथील आणखी दोनजण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. तसेच, सासवड शहरात नवे पाच रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. आजच्या पुरंदर तालुक्यातील नवीन सातपैकी तीन रुग्ण अगोदरच पुण्यात रुग्णालयात दाखल आहेत. तर, पाच जणांना सासवडच्या कोविड केअर सेंटरला भरती केले आहे.

पुरंदर तालुक्यात काल तब्बल 19 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निष्पन्न झाले होते. तर, आज सात रुग्ण सापडले. त्यातून आज तालुका 222 वर पोचला. सासवडमध्ये काल दहाने रुग्ण वाढून एकुण रुग्ण 126 झाले होते. सासवडला आज पाच रुग्ण वाढलेत व शहर रुग्ण संख्येत 131 वर पोचले आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित गावे 30 वर पोचून ग्रामीणमध्येही धाकधूक वाढतच आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मोठे प्रयत्न ग्रामपंचायतींना हाती घ्यावे लागतील. 
 

लॉकडाउनबाबत उद्या बैठक
सासवड शहरातील लाॅकडाउन मंगळवारपर्यंत (ता. 14) सुरु राहिल. शहरात बर्‍यापैकी शुकशुकाट दिसून येत आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी लाॅकडाउनची कडक अंमलबजावणी केली. तसचे, पालिका सेवक संजय पवार, राजेंद्र निरगुडे, अमित बहीरट आदींनी ध्वनिक्षेपकासह फिरून लाॅकडाउन चांगला राबविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यातून शहरात गर्दी दिसत नाही. त्याचे बरेच परिणाम रुग्ण संख्येत दिसत आहेत. पालिका नियम मोडणारांना जागेवरच दंड करीत आहे. त्यातूनही गर्दीला आवर बसला असून, पुढील लाॅकडाउन शिथील करणे वा वाढविण्याबाबत उद्या पालिकेत दुपारी बैठक होईल, असे सांगण्यात आले.
 
Edited by : Nilesh Shende
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT