Pune BJP Former Corporator Rajendra Shilimkar Esakal
पुणे

Shankar Maharaj Math: पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवक अन् मुलासह चौघांवर गुन्हा, शंकर महाराज मठात नेमकं काय घडलं?

Pune BJP Former Corporator: यावेळी चेतन हे सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही जबाब वा तक्रार घेतली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजेंद्र शिळीमकर यांच्यासह त्यांचा मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर आणि महेश शिळीमकर अशा चौघांचा समावेश आहे.

शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्यासाठी मज्जाव करत, शिळीमकर यांनी मारहाण केल्याप्रकरणी चेतन आरडे यांचे उपोषण सुरू होत. या उपोषणाची दखल घेत पोलिसांकडून शिळीमकर पिता पुत्र पुतण्यांवर कारवाई केली आहे.

शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्याकरीता मज्जाव करत, अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करत व बेदम मारहाण केल्याचा आरोप शिळीमकरांवर आहे. या प्रकरणी पीडित चेतन आरोडे गेल्या पाच दिवसांपासून पुणे समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईची पाऊले उचलली.

शंकर महाराज मठात काय घडलं?

चेतन आरडे हे मातंग समाजातील असून, तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहेत. 20 जून 2024 रोजी सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ही आले होते.

मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांनाही आत जायचे होते. परंतु नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतन यांना मारहाण केली, असा आरोप आहे.

घटना घडली त्यावेळी याप्रकरणी चेतन यांनी 112 नंबरवर डायल करून पोलिसात तक्रार केली असता पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत.

यावेळी चेतन हे सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही जबाब वा तक्रार घेतली नाही. त्यामुळे पीडित हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते.

यावेळी मारहाण व शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून जीवितास धोका असून त्यांच्यावरती अनुसूचित जाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय द्यावा असे आरडे यांनी लेखी पत्र दिल होत. अखेर या पत्राची दखल घेत शिळीमकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

'मुलीच्या घराबाहेर थांबा' म्हणणं अल्लू अर्जुनला पडलं महाग; 'स्टॉकिंगला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करत केलं ट्रोल

Solapur News: मोहोळमध्ये तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले; तरुणी बँक कर्मचारी अन् काय घडलं..

Latest Marathi News Live Update : पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघात

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT