पुणे

Shantanu Abhyankar: "वैज्ञानिक दृष्टिकोन हा डॉ. अभ्यंकरांच्या जगण्याचा मुलाधार"; आदरांजली सभेत आठवणींना उजाळा

विज्ञानवादी लेखक, लोकविज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : नावीन्यपूर्ण, समरसून, सर्जनशीलपणे जगता येणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर होय. त्यांच्या जगण्याचा मूलाधार वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्यामुळेच त्यांना हे शक्य झालं, अशा शब्दात डॉ. अभ्यंकर यांना गुरुवारी पुण्यात समविचारी मित्र परिवार आणि संघटनांकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सभेत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला.

विज्ञानवादी लेखक, लोकविज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वय ६०) यांचे गुरुवारी (ता. १५) प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी लोकविज्ञान संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान मंच, समाजविज्ञान अकादमी यांनी आदरांजली सभेचे बुधवारी (ता. २१) आयोजन केले होते.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर, माजी खासदार प्रदीप रावत, अनिल जोशी, अनंत फडके, अविनाश पाटील, विशाल विमल, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. विवेक सावंत, शरद अष्टेकर, अजित अभ्यंकर, स्वानंद बेदरकर, कुमार नागे आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिक, हितचिंतक, चाहते, साहित्यिक, वाचक, कलाकार, कार्यकर्ते, डॉक्टर्स, अभ्यासक, विचारवंत यांनी त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिताचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘‘ग्रामीण समाजजीवन, ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये आरोग्याशी निगडित अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.’’

लोकविज्ञानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘‘अनेक डॉक्टर शिक्षणासाठी पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले. मात्र समाजनिष्ठा, तत्वनिष्ठतेमुळे डॉ. अभ्यंकर यांनी शिक्षण पूर्ण करून वाई येथे आपल्या कामाला सुरुवात केली.’’ ‘‘शंतनू अभ्यंकर यांचे राधिका सांत्वन हे नाटक मिळून सा-या जनीच्या व्यासपीठावर व्हावे अशी त्यांची खुप इच्छा होती. मात्र हे होवू शकले नाही याचे मला दुखः आहे.’’ असे ज्येष्ठ संपादिका गीताली वि. म. यांनी सांगितले. अनिल जोशी म्हणाले ‘‘सर्वसमावेशक विज्ञानवादी पुरोगामी विचाराचे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT