Court 
पुणे

तिने व तिच्या कुटुंबीयांनी पतीपासून आजार लपवला अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे - लग्नापूर्वी दहा वर्षांपासून फिट येत असल्याची बाब तिने व तिच्या कुटुंबीयांनी पतीपासून लपवीत लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर चार महिन्यांतच तिचा हा आजार उघड झाला. त्यामुळे पत्नीने फसवणूक केल्याने हे लग्न अवैध ठरवून ते रद्द करण्यासाठी पतीने येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला आहे.

फसवणूक केलेले लग्न बेकायदा ठरवून ते रद्द करण्यासाठी हिंदू विवाह कायद्याच्या कलम १२ नुसार न्यायालयात दाद मागता येते. त्यानुसार पती पवन यांनी पत्नी रेश्‍मा यांच्याबरोबर झालेले लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेश्‍मा यांना लग्नाच्या आधीपासून फिट येत होती. मात्र, ही बाब कोणाला सांगितली तर आपले लग्न होणार नाही या भीतीने त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवत पवन यांच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर चार महिन्यांतच पवन यांना ही बाब समजली. त्यामुळे ते तिला डॉक्‍टरकडे घेऊन गेले. डॉक्‍टरांनी तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांची सर्व माहिती पवन यांना दिली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर मला फसवून हे लग्न करण्यात आले आहे. त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, असा दावा पवन यांनी ॲड. सुनीता जंगम यांच्यामार्फत दाखल केला होता. 

ॲड. जंगम यांनी रेश्‍मा यांच्यावर आधीपासूनच उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे फिट येत असल्याचे सिद्ध झाले. या पुराव्यांचा विचार करत न्यायालयाने हे लग्न रद्द ठरवले. पवन यांचा इंटेरिअर डिझायनिंगचा व्यवसाय आहे, तर रेश्‍मा या गृहिणी आहेत. लग्न झाल्यानंतर एका वर्षांच्या आतच ते विभक्त झाले आहेत.

लग्न हे एकमेकांच्या विश्‍वासावर अवलंबून असते. सुरुवातीच्या काळातच असा विश्‍वासघात केला तर जोडीदार कायद्याची मदत घेतो. लग्न ठरवताना ही विश्‍वासार्हता जपत पारदर्शकता ठेवली पाहिजे. आपला जोडीदार एखादी बाब स्वीकारू शकतो. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी काहीही लपवून न ठेवता सर्व काही लग्नापूर्वीच एकमेकांना सांगितले पाहिजे. जाणीवपूर्वक खोटे सांगितले तर साथीदाराची निराशा होत असते. 
- ॲड. सुनीता जंगम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Kalmadi: सबसे बडा खिलाडी! सुरेश कलमाडींच्या एका डावाने विलासरावांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी गेली?

माेठा निर्णय! पोषण आहाराची दैनंदिन उपस्थिती पोर्टलवर भरणे बंधनकारक; अन्यथा कारवाई, काय आहे शिक्षण विभागाचा आदेश?

प्रेमासाठी पाकिस्तान गाठलेला 'बादल बाबू' आता कोठडीत; सुटकेसाठी पालकांची मोदी-शाहांकडे धाव

Stock Market Today : शेअर बाजार 'लाल' रंगात उघडला; अमेरिकन टॅरिफचा दबाव, मात्र तिमाही निकालांमुळे 'हे' शेअर्स तेजीत

Latest Marathi News Live Update : नाशिकचे दोन माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT