corona 
पुणे

शिरूरला दिलासा, कोरोनाच्या वाढीचा आकडा पहिल्यांदाच एकअंकी  

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : गेल्या महिनाभरापासून शिरूर तालुक्याला विळखा टाकलेल्या कोरोनाची पकड आज काहीशी ढिली झाली. गेल्या महिन्यात एकदाही दोन अंकी संख्येच्या खाली न आलेल्या कोरोनाचा विषाणू आज पहिल्यांदाच एकअंकी वर आला. आज तालुक्यातील पाच गावांत सातजणांना कोरोनाची बाधा झाली.

शिरूर तालुक्यात सुरवातीला दहा, नंतर वीस, त्यानंतर तीस, अशी टप्प्याटप्प्याने कोरोनाबाधित रूग्णसंख्या वाढत गेल्याने व गेल्या आठ दिवसांत तर सलग ३५ ते ३८ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत राहिल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामानाने आज काहीसा दिलासा मिळाला. आज दिवसभरात शिरूर शहर व रांजणगाव गणपती येथील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले; तर कवठे येमाई, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे प्रत्येकी एक बाधित आढळला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. 

शिरूर तालुक्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण २८ मार्च ला सणसवाडी येथे सापडला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेला. मध्यंतरी रूग्ण संख्येचा गुणाकार होऊ लागल्याने तालुक्याला कोरोनाचा जबर विळखा पडल्याचे चित्र होते. गेले दहा बारा दिवस दररोज तीस ते ३५ रूग्ण सापडत होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आज काहीसा दिलासा मिळाला. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आजअखेरची संख्या ६५६ झाली असून, तीनशेच्या वर रूग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. शहरातील एका ८२ वर्षीय निवृत्त शिक्षकाने जिद्द, चिकाटी व शिस्तीचे काटेकोर पालन करीत कोरोनावर मात केली असून, त्यांच्याच कुटूंबातील तिघे बाधितही कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. त्यांच्या तपासण्यांतून त्यांचा धोका टळला असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. 

शहरात आतापर्यंत १२१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ६१ जण ठणठणीत झाले असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी दिली. गेल्या चार- पाच दिवसांतील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ८४ जणांचे स्वॅब आज येथील कोवीड केअर सेंटरमध्ये कलेक्ट करून ते शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.  शहर व परिसरात कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी शहरातील कोवीड केअर सेंटरमध्ये सकाळी साडेदहा वाजता यावे. त्यावेळी स्वॅबचे नमुने घेऊन ते टेस्टिंगसाठी पाठविले जातात, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. आपल्या घरातील अथवा परिसरातील व्यक्तींमध्ये कोरोनासदृष लक्षणे आढळल्यास त्वरीत नगर परिषद किंवा शिरूर ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT