shivneri
shivneri 
पुणे

शिवजन्मस्थानी गुंजली शिवराज्याभिषेक दिनाची धून...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : सकाळच्या मंगल प्रहरात पावसाची रिमझिम सुरू असताना भंडाऱ्याची उधळण करत शिवजन्मस्थानी शिवभक्तांनी मंगलमय वातावरणात प्रतिकात्मक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेतला.

मंचर (ता. आंबेगाव) येथील 'आम्हीच ते वेडे, ज्यांना आस इतिहासाची' या शिवभक्तांच्या ग्रुपमधील चार सदस्यांनी आज शिवजन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायगडावर या वर्षी उत्सवासाठी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वप्नील घुले, अक्षय भालेराव, संपत जठार, अजित भालेराव या चार युवकांनी हा सोहळा रायगडाऐवजी  शिवनेरीवर साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

शिवनेरीवर शिवजन्मस्थानी सकाळी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पूजन केले. शिवजन्मभूमीला नतमस्तक होत शिवरायांना वंदन केले. शिवजन्मस्थानाबाहेर तलवारीचे खेळ खेळले. भंडाऱ्याची  मुक्त हस्ते उधळण करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत हा सोहळा संपन्न केला. 

आम्ही गेली आठ वर्षे नियमितपणे रायगडावर या सोहळ्यासाठी जातो. मात्र, या वर्षी कोरोनामुळे रायगडावर येऊ नये, असा संदेश आल्याने या वर्षी हा सोहळा चुकणार, असे वाटत असताना कोरोनामुळे असणाऱ्या नियमांचे पालन करत हा सोहळा शिवजन्मस्थानी साजरा करण्याचे ठरविले होते. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने खूप आनंद वाटत असल्याचे या युवकांनी सांगितले.

या वेळी शिवनेरीवर उपस्थित असलेले शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष स्थानिक शिवप्रेमी रवींद्र काजळे यांनी या युवकांचे स्वागत केले. या सोहळ्यात रंगून जात या शिवभक्तांनी शिवजन्मस्थानी साजरा केलेल्या पहिल्याच  राज्याभिषेक सोहळ्याची इतिहासात नोंद राहील, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT