corona 
पुणे

धक्कादायक, आळंदीतील आणखी सहा पोलिसांना कोरोना... 

विलास काटे

आळंदी (पुणे) : खेड तालुक्यातील आळंदी येथील पोलिस ठाण्यातील आणखी दोन पोलिस अधिकारी  आणि चार पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच,  देहू फाट्यावरील मोबाईल शॉपी चालकासह तीन आणि धाकट्या पादुकाजवळ एक, अशा एकूण दहा जणांना कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आळंदीत आता अकरा कोरना रुग्णांची संख्या अकरा झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. 

आळंदी पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांचा कोरोना अहवाल सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या वीस पोलिसांची टेस्ट केली. यामध्ये दोन अधिकारी आणि चार पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, देहूफाट्यावर एका मोबाईल चालकाचा आणि त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती, दुकानातील कामगार, अशा तिघांसह धाकट्या पादुकावरील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आळंदीत एकूण अकरा रुग्ण झाले आहे. अद्याप दहा पोलिसांचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, आळंदीतील देहू फाटा येथील आर्या आर्केड, साई समृद्धी आणि आळंदी पालिका शाळा नंबर चारमधील कृष्णाई इमारतीकडील रस्ता सील केला आहे. या तीनही ठिकाणी 28 दिवसांसाठी कंटेन्मेट झोन जाहीर केला असल्याचे भूमकर यांनी सांगितले. 

माउलींच्या पादुका मंगळवारी (ता. ३०) पंढरपूरला मार्गस्थ होण्याच्या एक दिवस आधी आळंदी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्यांच्या सोबतचे सात पोलिसही कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे प्रशासनाने अधिक काळजी घेणे आवश्यक होते. मात्रस माउलींचा सोहळा पंढरीकडे जाताना कोरोनाबाधित अधिका-यांसोबतच्या पोलिसांना त्याचदिवशी क्वारंटाइन करणे आवश्यक होते. मात्र, तरीही माउलींचा सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होताना हे पोलिस बंदोबस्तावर होते. त्यादिवशी आजोळघरात सोशल डिस्टनन्सिंगचा कोणताही सोपास्कार केला नाही. पादुका आजोळघरातून बसमध्ये नेताना अतोनात गर्दी जमली होती. आज पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांचाही वावर आजोळघरात होता. त्यामुळे आळंदीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

आळंदीत आता पुढील काही दिवस लॉकडाउन घोषित करण्याची वेळ आल्याचे आळंदी विकासमंच आणि नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले. लग्नासाठी बाहेर गावच्या लोकांना बंदी करून कार्यालयांनाही मज्जाव करणे आवश्यक बनले आहे. भाजी मंडईही आठवडा बाजार करण्याची मागणी आळंदीकरांतून होत आहे. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले की, याबाबत लवकरच तातडीची विषेष सभा घेऊन धोरण ठरवले जाईल. एकंदर पोलिसांना कोरोना झाल्याने प्रशासन अधिक काळजी घेईल, अशी आशा आळंदीकरांना आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT