Shops closed tomorrow in Pimpri-Chinchwad
Shops closed tomorrow in Pimpri-Chinchwad 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये 2 दिवस दुकाने बंद व्यापारी महासंघाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमधील किराणा माल, औषधे आणि भाजीपाला वगळता इतर सर्व दुकाने उद्या बुधवारी (ता.18) आणि गुरुवारी (ता.19) बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ असोसिएशन या शिखर संघटनेने घेतला आहे. या बंदबाबत गुरुवारी फेर आढावा घेतला जाणार आहे. 

CoronaVirus : पुण्याचा लाडका बाप्पा होणार आयसोलेट; दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद
करोना विषाणूच्या आपत्तीवर चर्चा करुन उद्योग-व्यवसाय आणि व्यापाराची पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड येथील हायवे टॉवर्स येथे व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी श्‍याम मेघराजानी, सराफ असोसिएशनचे रमेश सोनिगरा, हॉटेल्स असोसिएशनचे पद्मनाभ शेट्टी, महेश मोटवानी, गंगाराम पटेल, अमोलिक दुगड, राजू चिंचवडे, सुरेश गादिया, गोविंद पानसरे आदी यावेळी उपस्थित होते. 

CoronaVirus : पुण्यातील हॉटेल्स आणि बार 3 दिवस बंद; वैशाली, रुपाली, गुडलक बंद
बाबर म्हणाले,"पुणे शहर व्यापारी महासंघाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी देखील बुधवारी (ता.18) आणि गुरुवारी (ता.19) दुकाने बंद ठेवणार आहेत. यामधून, किराणा-भुसार, औषधे आणि भाजीपाला दुकानांना वगळण्यात आले आहे. गुरुवारी (ता.19) सायंकाळी आढावा बैठक घेऊन बंद बाबत पुढील निर्णय घेतला जाईल.'' 

हेही वाचा :Corona Virus: घरून काम करताना ही घ्यावी काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT