पुणे

#GyanGanesh अवकाश विस्तारणारं दानशूर दांपत्य

मीनाक्षी गुरव

पुणे - मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रीपाद चारचौघांसारखाच शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागतो. परंतु सामाजिक जाणिवेचे भान ठेवत त्याने संसार बाजूला ठेवून सामाजिक कृतज्ञतेचा संसार मांडला आहे. स्वत:च्या आणि पत्नीच्या पगारातील काही रक्कम बाजूला ठेवून त्यातून शिक्षणाची आवड असणाऱ्या दुर्गम भागातील आठ मुलांच्या उच्च शिक्षणाचे पालकत्व त्याने स्वीकारले आहे. त्यामुळे या मुलांचे अवकाश विस्तारले आहे. 

श्रीपाद घोडके आयटी क्षेत्रात तर त्याची पत्नी शलाका एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करते. हे दोघे गेल्या बारा वर्षांपासून आपल्या पगारातील काही रक्कम बाजूला ठेवून सामाजिक संस्थांना मदत करतात. व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी परभणी जिल्ह्यातील ‘स्वप्नभूमी’ या संस्थेला मदत देण्यास सुरवात केली. संस्थेत दुर्गम भागातील एकल पालकत्व असलेली ही मुले आहेत. 

परंतु दहावीनंतर या मुलांच्या शिक्षणाचा आणि सर्वांगीण विकासाचा प्रश्‍न श्रीपाद आणि शलाका या दोघांच्याही लक्षात आला. मग त्यांनी आठ मुलांना घरी आणून पुढील शिक्षण देण्याचे ठरविले. त्यांचे पालक म्हणून कार्यरत असताना, त्यांची सगळीच जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या ‘मोठ्या’ कुटुंबाला व्यवस्थित राहता यावे, यासाठी श्रीपाद यांनी आपला टू बीएचके फ्लॅट भाड्याने देऊन एक छोटेखानी बंगला घेतला आहे. या कार्याचा आणखी विस्तार करण्यासाठी या दांपत्याने आता गेल्या वर्षी ‘अद्विका वेल्फेअर फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून पुण्यात शिक्षणासाठी आणलेली आठ मुले घोडके कुटुंबाचा भाग बनली आहेत. घोडके दांपत्याच्या पाठबळावर ही मुले आता भरारी मारण्यासाठी सज्ज होत आहेत.

अभ्यासाची आवड असणाऱ्या दुर्गम भागातील या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. शहरी मुलांच्या स्पर्धेत ही मुले कुठेही कमी पडू नयेत, म्हणून त्यांना आपल्याबरोबरच ठेवण्याचा निर्णय घेतला. यातील एका विद्यार्थ्याला नुकतीच एव्हिएशनमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी साडेसहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
- श्रीपाद घोडके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT