Ganesh_Visarjan_Police
Ganesh_Visarjan_Police 
पुणे

साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2020 : पुणे : घरगुती गणपतीचे घरच्या घरी, सोसायटीत किंवा फिरत्या हौदात, तर मंडळांच्या गणपतींचे तेथील हौदातच विसर्जन करा, असे आवाहन करतानाच पुणे पोलिस गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. तब्बल साडे सहा हजार पोलिस मंगळवारी घाटावर, रस्त्यावर, मंडळ परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त करणार आहेत. "गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पुणेकरांनी अतिशय संयम दाखवित इतरांना आदर्श घालून दिला आहे. त्याच पद्धतीने विसर्जनाच्या दिवशी देखील पुणेकरांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन घडेल,'' अशी अपेक्षा पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव संपन्न होत आहे. मागील दहा दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळांनी पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यास प्राधान्य दिले. दीड, तीन, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणपतींचे मोठ्या प्रमाणात घरच्या घरी किंवा हौदात विसर्जन करण्यात आले. तसेच अनेक नागरिकांनी मूर्तीदान करण्यालाही पसंती दर्शविली. आता मंगळवारी होणाऱ्या विसर्जनाच्या दिवशी देखील पुणेकरांकडून हाच प्रतिसाद मिळावा, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात नागरीक दर्शनासाठी रस्त्यावर येत असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करुन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. विशेषतः गटागटाने येणाऱ्यांना पोलिसांनी समज देऊन परत पाठविले. त्याच पद्धतीने विसर्जनाच्यादिवशी देखील गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त, बॅरीकेड लावून नाकाबंदी केली जाणार आहे. गैरसमजातून लोक एकत्र येऊ नयेत, लोकांनी नियम पाळावेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त असणार आहे, असे डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.

शिसवे म्हणाले... 
- शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरीकेड आणि नाकाबंदी 
- सीसीटीव्हीद्वारे ठेवणार संपूर्ण शहरावर लक्ष 
- कालवा, तलाव, घाटांवर विसर्जनाला परवानगी नाही 
- मानाचे पाच आणि प्रमुख तीन मंडळांच्या श्रींचे विसर्जन मंडपाजवळील हौदात 
- मंडळांच्या आवारात नियमांचे पालन करून मोजक्‍या कार्यकर्त्यांकडून विसर्जन 
- गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्ताची आखणी 
- मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील मंडळांचा पोलिसांशी संवाद

मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे विसर्जन पाहा लाईव्ह 
शहरातील मानाच्या पाच गणपतींसह तीन प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या श्रींचे विसर्जनही मंडपातील हौदातच विसर्जन केले जाणार आहे. नागरीकांना विसर्जन सोहळा पाहून दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाचे फेसबूक पेज, संकेतस्थळ यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहेत. 

असा असेल बंदोबस्त 
* साडे सहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर 
* बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) राहणार कार्यरत 
* जलद कृती दलही ठिकठिकाणी असणार तैनात 
* गुन्हे शाखेच्या पथकांचाही असणार 'वॉच' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT