co.jpg
co.jpg 
पुणे

अरे बापरे : औंधकरांनो आता तरी काळजी घ्याल का...

सकाळवृत्तसेवा

औंध : बोपोडी येथे दोन व चिखलवाडी येथील एकाच कुटूंबातील चार अशा एकूण सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने औंध क्षेत्रिय कार्यालयांतर्गत रुग्ण संख्या वाढली आहे.

बोपोडी येथील वयोवृद्ध रुग्ण रुबी हाॅल  रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे. तर चिखलवाडी येथील चौघांनाही बालेवाडीतील निकमार वसतिगृहात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. बोपोडीतील संबंधित रुग्णाची अगोदरच ह्रदय शस्त्रक्रिया झालेली असून दम्याचा त्रास आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, त्यांच्या घरातील व शेजारच्या एकूण बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर  बोपोडीतीलच एका अठ्ठावीस वर्षीय चालकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या घरातील सहा जणांची तपासणी करण्यात आली असून, अहवाल येणे बाकी आहे. तर या चालकाला उपचारासाठी कै. द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे परिमंडळ  वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे यांनी सांगितले.

तसेच चिखलवाडी येथील कुटूंबात एका वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्याच कुटूंबातील पंधरा जणांची बोपोडीतील कै. द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयात स्वॅब तपासणी केली असता पंधरा पैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात एक महिला व एक पुरुष अशा दोन ज्येष्ठ तर दोन वीस वर्षाच्या आतील मुलींचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सध्या एकूण बारा रुग्णांची नोंद झाली असून सात जणांवर उपचार सुरू असून पाच जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. औंध क्षेत्रिय कार्यालयांतर्गत रुग्ण संख्या वाढत असतांना सर्वांनी नियमांचे पालन करुन  कोरोनाचा सामना करण्यासाठी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेऊन या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे   असे आवाहन सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT