पुणे

मोटारसायकलवरुन रोकड चोरुन लागले धूम ठोकायला पण...

मिलिंद संगई

बारामती : मोटारसायकल वरुन येत रोकड चोरुन नेलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोपदेव घाटात 29 नोव्हेंबर रोजी तीन मोटारसायकलवरुन आलेल्या आठ जणांनी एका व्यक्तीस अडवून त्याच्या सॅकमधील 1 लाख 30 हजार रुपये लुटून नेले होते. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल बारामतीतील फलटण चौकात असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार संजय जगदाळे, रुपेश साळुंके, ओंकार सिताप, सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी करिझ्मा व पल्सर कंपनीच्या दोन मोटारसायकलवर असलेल्या रोहित सुरेश बाबर (रा. महात्मा फुले सोसायटी, सासवड, ता. पुरंदर) व राजेश सिताराम निघोल (रा. दत्तनगर सासवड) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांचे साथीदार चेतन उर्फ भैय्या वैराग, सनी मिसाळ, जगन्नाथ दत्ता वाघमारे व बाबू (पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा. महात्मा फुले सोसायटी, सासवड, ता. पुरंदर) यांच्या मदतीने ही चोरी करुन सर्वांनी ही रक्कम वाटून घेतल्याचे कबूल केले. हे सर्व पैसे खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान या सर्वांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील काही जणांवर या पूर्वीचे कोंढवा, सासवड या पोलिस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prada Kolhapuri Chappal : ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायरर्ड बाय कोल्हापुरी चप्पल’, कापशी पायतानचा ब्रॅण्ड प्राडाने स्वीकारला

Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅप गोडवूनला भीषण आग

Ramdas Athawale: ‘भोंदूगिरी रोखण्यासाठी बुवा-बाबांची चौकशी व्हावी’: राज्यमंत्री रामदास आठवले, शिवाजी महाराजांवरील वक्तव्य वादग्रस्त!

Police Bribery Case Kolhapur : भुदरगड पोलिस ठाण्याच्या हवालदाराने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली अन्, रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी, कारणही धक्कादायक

SCROLL FOR NEXT