Vaccination
Vaccination Sakal
पुणे

लसीकरणासाठी ‘अब तक ८४’

सु. ल. खुटवड

जनुभाऊ आज सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठले. सगळी कागदपत्रे गोळा करून पिशवीत भरली. हात जोडून देवापुढे नारळ फोडला.

‘देवा, माझं आजतरी लसीकरण होऊ दे. तसं झाल्यास मी तुला सोन्याची इंजेक्शनची सिरींज वाहीन.’ असा नवसही ते बोलले. त्यानंतर बायकोकडे पहात ते शांतपणे म्हणाले, ‘‘लसीकरणाचे डोस उपलब्ध झाल्याने आज मला नक्की दुसरा डोस मिळेल.’ जनुभाऊंचे बोलणे ऐकून, बायकोच्या डोळ्यात पाणी तरळलं. गेल्या काही दिवसांपासून जनुभाऊ दररोज रांगेत उभे राहत आहेत. मात्र, त्यांना काही ना काही कारणाने डोस मिळत नव्हता. मात्र, तरीही त्यांनी हार मानली नव्हती.

सकाळी सातच्या सुमारास ते रांगेत उभे राहिले. ‘लस उपलब्‍ध असून, सर्वांनी शांतता बाळगावी’ या पाटीकडे पाहून त्यांना समाधान वाटले. नऊच्या सुमारास कर्मचारी आले. प्रत्येकाची कागदपत्रे ते तपासू लागले. पहिल्या डोसला ८४ दिवस पूर्ण झाले नाहीत म्हणून अनेकांना घरी पाठवले. बुकींग केलेल्या पन्नास जणांना पहिल्या डोसचा दहा टक्के कोटा पूर्ण झाला म्हणून ‘उद्या या’ असे सांगितले.

तेवढ्यात जनुभाऊंचा नंबर आला. त्यांनी पहिल्या लसीकरणाचे कार्ड, जन्मदाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, लग्नाचा दाखला, पासपोर्ट, रेशनकार्ड, मृत्यूपत्र ही सगळी कागदपत्रे कर्मचाऱ्याच्या पुढे ठेवली. एवढी सगळी कागदपत्रे पाहून कर्मचाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

‘साहेब, मरण्यापूर्वी मला दोन डोस मिळाले नाहीत तर किमान माझ्या बायकोला तरी ते मिळावेत’ अशी इच्छा मी मृत्युपत्रात व्यक्त केली आहे.’ त्यानंतर कर्मचाऱ्याने लसीकरणाचे कार्ड पहात म्हटले, ‘आजोबा, तुम्हाला आज लस देता येणार नाही.’’

‘पण का? रोज मी तुमची वेगवेगळी कारणे ऐकून कंटाळलोय. आज काहीतरी वेगळं कारण तरी सांगा.’ जनुभाऊंनी रागाने म्हटले.

‘तुम्ही दुसऱ्या डोससाठी पात्र नाहीत. पहिल्या डोसला ८४ दिवस होणे अपेक्षित आहे. तुम्हाला आज ८३ दिवस पूर्ण झाले आहेत. तुम्ही उद्या या. आम्ही आज तुम्हाला वेगळं कारण दिलंय. झालं समाधान.’ कर्मचाऱ्याने बेफिकिरीने म्हटले.

‘अहो साहेब, गेला दीड महिना मी दुसऱ्या डोससाठी रोज येतोय. तुमचे नियम सारखे बदलतात कसे? आधी दुसरा डोस २८ दिवसांनंतर होता. त्यानंतर ४५ दिवसांचा केला. आता ८४ दिवसांचा केला. उद्या १२५ दिवसांचा कराल. आम्ही आमचे म्हातारपण रांगेत उभं राहूनच घालवावं, अशी तुमची इच्छा आहे काय? मी तुमचा निषेध करतो.’ जनुभाऊंनी त्रागा करीत म्हटले.

‘एकवेळ ८४ फेरे पूर्ण होऊन, पुनर्जन्म मिळेल पण तुमची लस मिळायची नाही. अहो, पहिल्या डोसला ८४ दिवस पूर्ण झालेत, अशी किती सर्वसामान्य नागरिक पुण्यात असतील, याचा तरी विचार करा.’? जनुभाऊंनी रागाने म्हटले.

‘ते आम्हाला माहिती नाही. आम्ही नियमांना बांधील आहोत. तुम्हाला उद्या ८४ दिवस पूर्ण होत आहेत. आज रात्रीपर्यंत नवीन नियमांचा ‘जीआर’ आला नाही तर तुम्ही उद्या या.’’

कर्मचाऱ्याने असं म्हटल्यावर जनुभाऊ त्रागा करीत, तेथून निघून जाऊ लागले. ‘आता बायकोला काय सांगू’? याची चिंता त्यांना लागली.

त्यानंतर बराचवेळ कर्मचारी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी होत राहिली. पण नियमांमुळे दिवसभरात कोणाचेही लसीकरण झाले नाही. दुपारी तीनच्या सुमारास एक नव्वदीतील गृहस्थ आले. त्यांनी ८५ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला होता. त्यांचे लसीकरण नियमात बसत असल्याने त्यांना दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या कर्मचाऱ्याने शाल व श्रीफळ आणून आजोबांचा सत्कार केला. मग डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत आजोबा म्हणाले, ‘‘मरणापूर्वी दुसरा डोस मिळेल, असे वाटत नव्हते. पण परमेश्‍वराची लीला अगाध आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT