ajit pawar someshwar sugar mill  sakal media
पुणे

'सोमेश्वर'च्या सभासदांनी अजित पवारांचं आवाहन खरं करुन दाखवलं

विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्याचीच पुनरावृत्ती सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी केली

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : ‘इतक्या प्रचंड मतांनी माझा पॅनेल निवडून द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे’ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी शब्दशः खरे केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी केली असून, सुमारे सोळा हजारांच्या भव्यदिव्य फरकाने विजयश्री बहाल करत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. दरम्यान, भाजपने पराभव निश्चित असतानाही लढाईत उतरून विरोधकांची भूमिका वठविली आहे.

ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी एकतर्फी होणार, अशीच चिन्हे कायम होती. अशात काकडे गटाने शेतकरी कृती समितीद्वारे स्वतंत्र अर्ज दाखल केले. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. शिवाय कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आघाडीधर्म पाळत मनापासून साथसोबत केली. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली. तसेच, कारखान्यात बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चारही कार्यक्षेत्रात पवारांना मानणारे आमदार असल्याने विजयाच्या मताधिक्याचीच चर्चा होती.

नाराजांना जमिनीवर आणले

अजित पवार यांनी प्रचाराच्या प्रारंभापासून, ‘नाराज मंडळींनी रूसू-फुगू नये. मी फोन बिन करणार नाही,’ असे सुनावले होते. ‘भविष्यात काहींना अन्य ठिकाणी संधी आहेत,’ असेही आश्वासन दिले होते. यानंतरही काही ठिकाणी नाराजीनाट्य निर्माण झाले. परंतु, सांगता सभेला असे फटकारले की सगळे जीव तोडून कामाला लागले. शेतकरी कृती समितीनेही आपल्या गटाचे सर्व अर्ज माघारी घेण्यात यश मिळविले. त्यामुळे नाराज उमेदवार अथवा मतांवर डोळा असलेल्या भाजपला हात चोळत बसावे लागले.

‘विकास’ हाच प्रचाराचा मुद्दा

खरे तर सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उतरविला आणि मागील चार वर्षात राज्यातील उच्चांकी भाव दिला. तसेच, साखर उतारा, गाळप, तांत्रिक क्षमता उजवी ठरली, हे वास्तव आहे. आजूबाजूला ‘खासगी’ जोमात वाढत असताना सोमेश्वरच्याही साखर, डिस्टिलरी, कोजनरेशन युनिटच्या विस्तारीकरणाचा विकास हाती घेतला. त्यामुळे सभासद समाधानी होते. अजित पवार यांनी याच मुद्द्यावर प्रचार करत अडचणीत आलेल्या कारखान्यांची उदाहरणे देत अगदी स्वतः सभासद असलेल्या छत्रपती कारखान्यालाही फटकारले.

भाजपची लढण्याची जिद्द

पराभव निश्चित असतानाही तडजोडनामा करण्यापेक्षा लढाईत उतरणे कधीही धाडसाचे. उपमुख्यमंत्र्यांनीही, ‘समोरच्यांना कमकुवत समजून गाफील राहू नका,’ असे सांगत, ‘ज्याला माझे विचार पटत नाहीत त्याने नाराज होण्यापेक्षा दिलीप खैरे, पी. के. जगतापांसारखा पॅनेल टाकावा,’ अशा शब्दात विरोधकांचा आदरच केला होता. खरे तर फाटक्या कपड्यातील आणि पेट्रोलला महाग असणारी बिनचेहऱ्याची माणसे उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनेलविरोधात उभी राहतात. कमी वेळेत सभासदांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्पद आहे. त्यांना लढाईत पुरेसे मुद्दे नव्हते, तयारीला वेळ नव्हता, प्रचाराला मर्यादित कालावधी होता.

निवडणुकीआधी दोन-चार वर्ष रान पेटवावे लागते, त्याशिवाय सभासद स्वीकारत नाहीत, हा धडाही त्यांना मिळाला आहे. परंतु, भाजपने कारखान्यात पहिल्यांदाच अधिकृत अंदाज घेतला आहे, याची नोंद सत्ताधाऱ्यांनाही घ्यावी लागणार आहे. सत्ताधाऱ्यांना यानिमित्ताने सगळी यंत्रणा ताकदीने राबवावी लागली, हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. अर्थात त्यायामुळे सोमेश्वर विकास पॅनेलच्या भव्यदिव्य विजयाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. समोर नवखा प्रतिस्पर्धी असतानाही गांभीर्याने कसे लढतात, हे दाखवून दिले असून, राज्यातील सर्वाधिक मतांचा विजय प्राप्त करत पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT