hemant dhokale
hemant dhokale 
पुणे

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, झेडपीच्या शाळेत शिकून एमपीएससीत चार वेळा फडकावला झेंडा

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, अशा विविध पदांच्या चढत्या कमानीने यश मिळवित असलेल्या शिरूर तालुक्यातील करंदी येथील हेमंत आबासाहेब ढोकले यांनी आता एमपीएससी परीक्षेतून तहसीलदार म्हणून यश मिळविले असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी त्यांनी सुरूच ठेवली आहे.

करंदी येथील अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील हेमंत ढोकले यांचे शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षणही गावातीलच विद्या विकास मंदिर शाळेत झाले. या दोन्ही ठिकाणी त्यांना शालेय अभ्यासक्रमाबाबत तत्कालीक सर्व शिक्षकांनी ज्या पद्दतीने अध्यापन केले, ते आजही कामाला येत आहे, असे ते सांगतात. त्याचा पहिला प्रत्यय त्यांना सन २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत आला, तर सन २०१७ मध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि सन २०१८ मध्ये मुख्याधिकारी परीक्षेतही त्यांना याच शालेय अभ्यासक्रमाच्या उत्तम बैठकीचा लाभ झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केवळ जिल्हा परिषद शाळेतील अभ्यासाच्या जोरावर इथपर्यंत पोहचल्याची त्यांची भावना असून, शासकीय सेवेत राहून कमी वेळेत मिळविलेल्या दोन परीक्षेतील यश हे त्यांनी करंदीच्या जिल्हा परिषद शाळेला दिले आहे.

दरम्यान, सध्या ते लोणंद (जि. सातार) शहरात मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून, वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतही अभ्यास करून इथपर्यंत यश मिळविण्यात माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


शिक्षण हे वाघिणीचे दुध...                             शिका आणि शिकत रहा, हे प्रत्येक समाजधुरीणांनी सांगितले आणि त्यानुसार शिकत गेल्याने आजपर्यंत तीन परीक्षा सहजपणे यशस्वी झालोय. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाही फार कठीण नाही. मात्र, या काळात पत्नी कायद्याचा अभ्यास करतेय. ती वकील असणे, हे माझ्या संपूर्ण कुटुंबाचे भूषण असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शाहु महाराज, महात्मा फुले यांनी जे सांगितलेय, त्या प्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिलं की गुरुगुरता येते. पण, ती गुरुगुर ज्ञानाची असते, याचा मला आता अभिमान वाटत आहे, असे ढोकले यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT