Sortapwadi Talathi red caught handed in ACB Trap 
पुणे

सोरतापवाडीत तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन :  जमिनीचे हक्कसोडपत्र व वाटपपत्राची नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील गावकामगार तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार (दि.७) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

रामकृष्ण तुळशीराम कारंडे हे लाच स्विकारणाऱ्या गावकामगार तलाठ्याचे नाव असुन, कांरडे यांच्यावर यापर्वीही लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ७) रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी येथील एका शेतकऱ्याकडे जमिनीचे हक्कसोडपत्र व वाटप नोंद घेण्यासाठी कांरडे यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र शेतकऱ्यांने एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिल्याने, कांरडे यांनी वीस हजार रुपयांत तडजोड करुन मंगळवारी पैसे घेऊन शेतकऱ्यास तलाठी कार्यालयात बोलवले होते. मात्र शेतकऱ्यांने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कांरडे याच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला होता.  यात कारंडे वीस हजाराची लाच घेताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. 

नागरीकांनी शासकीय कामासाठी कोणालाही वाच देऊ नये. लाच देणे कायद्याने गुन्हा आहे. कोणी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ०२०२६१२२१३४, ९४२०९०१९०६ या फोन नंबरवर अथवा spacbpune@mahapolice.gov.in यावर तात्काळ तक्रार करावी. शासकीय सेवेत असणारा कर्मचारी असो वा अधिकारी, कोणीही शासकीय कामासाठी पैशाची मागणी केल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तात्काळ कारवाई करण्यात येईल
- राजेश बनसोडे, अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT