Sound-Pollution 
पुणे

पुण्यात यंदा फटाक्‍यांचा आवाज कमीच

सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवाळीतील फटाक्‍यांचा आवाज मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा कमी झाल्याचे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. दिवाळीचा पहिला दिवस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या तीन दिवसांमध्ये शहरातील आवाजाची पातळीचे निरीक्षण ‘एमपीसीबी’तर्फे करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री पुणेकरांनी प्रदूषणाची दिवाळी साजरी केल्याचेही या आकडेवारीतून दिसत आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामान्यतः सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आवाजाची पातळी ६५ डेसिबल तर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ५५ डेसिबल असणे आवश्‍यक असल्याचे ‘एमपीसीबी’ने निश्‍चित केले आहे. त्यानुसार यंदा पुण्यात लक्ष्मीपूजनादिवशी सकाळी सहा नंतर शहरातील आवाजाची पातळी ७६ डेसिबल तर रात्री दहानंतर ६६.४ डेसिबल इतकी नोंद झाली आहे. 

कोरोनामुळे प्रशासनामार्फत फटाक्‍यांशी संबंधित काही निर्बंध लावण्यात आले होते. फटाक्‍यांचा कमी वापर करण्याची नागरिकांची मानसिकता दिसून आली. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीवरून घसरत ‘खराब’वर पोचली होती. त्यामुळे फटाक्‍यांचा वापर कमी झालेला नसून यामध्ये केवळ आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची संख्या कमी असल्याचे समजू शकते. शहराच्या तुलनेत दिवाळीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी पिंपरी-चिंचवड येथील ध्वनी प्रदूषण कमी नोंदले गेले. 

नांदेडमध्ये सर्वांत कमी प्रदूषण
राज्यात यंदा सर्वांत कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद नांदेड येथे झाली. नांदेड येथे लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ६३.२ तसेच रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ५४.३ डेसिबल इतके नोंदले गेले. ही पातळी ‘एमपीसीबी’च्या मानकांनुसार कमी असल्याचे आढळले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune: पाणीटंचाईने सोसायट्यांचे गणित कोलमडले; टॅंकरच्या दरात वाढ : देखभाल शुल्क वाढल्याने सभासदांवर आर्थिक बोजा

Panvel: पनवेलमधील व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर; अंगणवाडी सेविकेने नव्हे तर आईनेच मुलीला मारहाण केल्याचे स्पष्ट

Jain Community : मालाडमधील 'त्या' वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा! जैन समाजाचे शिष्टमंडळ 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंना सुपूर्द केला लेखी माफीनामा

SCROLL FOR NEXT