Special campaign of police against drunk driving on Thirty First 
पुणे

थर्टी फर्स्टला वाहन चालवताय? जरा जपून; पाहा पोलिस काय कारवाई करणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभुमीवर मद्यपान करुन वाहन चालवित स्वतःसह दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत वाहतुक पोलिसांसह पोलिस ठाण्यांच्या पोलिसांकडून नाकाबंदी करुन तपासणीवर भर देण्यात आला आहे. 

मागील वर्षभरामध्ये अपघात रोखण्यामध्ये पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेला यश आलेले असले, तरीही मागील दोन महिन्यामध्ये मात्र ही अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याची सद्यस्थिती आहे. त्याची पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेत महत्वाचे निर्णय घेतले. विशेषतः 31 डिसेंबर व एक जानेवारीच्या पार्श्‍वभुमीवर तरुणांकडून मद्यपान करुन भरधाव वाहने चालविण्याचे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे अपघात होऊन त्यामध्ये संबंधीत वाहनचालकासह सर्वसामान्य नागरीकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. अशा वाहनचालकांविरुद्ध पुणे पोलिसांनी मागील वर्षीही विशेष मोहिम राबवून अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यादृष्टीने यावेळी एक आठवडा आगोदरच पोलिसांनी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

रविवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर स्थानिक पोलिसांची पथके नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये भरधाव वाहन चालविणे, मद्यपान करुन वाहन चालविणे यांसारख्या विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

"सर्वोच्च न्यायालयाने अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांनी ठोस उपाययोजना करुन अपघात कमी करण्यात यश मिळविले. परंतु नोव्हेंबरमध्ये पुन्हा अपघात वाढले. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभुमीवर अपघाताचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. 1 जानेवारीपर्यंत ही मोहिम कायम राहील. डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT